Chandrashekhar Bawankule : शर्तभंग झालेल्या जमिनी सरकार जमा करणार

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश



मुंबई : राज्यातील सिडको, नैना, एमएमआरडीए(MMRDA) तसेच विविध नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या अखत्यारीत असलेल्या, परंतु अटी व शर्तींचे उल्लंघन (शर्तभंग) झालेल्या शासकीय जमिनी विशेष मोहीम राबवून तातडीने शासनाने स्वतःच्या ताब्यात घ्याव्यात, असे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. राज्यातील सर्व वर्ग-२ च्या जमिनींची सखोल माहिती घेण्याचे निर्देशही त्यांनी शुक्रवारी उच्चस्तरीय बैठकीत दिले.



मेट्रो लाईन ४ कारशेड बाधित शेतकऱ्यांना आश्वासनानुसार मोबदला देण्याच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत महसूलमंत्री बावनकुळे बोलत होते. यावेळी आमदार निरंजन डावखरे यांच्यासह महसूल विभाग आणि एमएमआरडीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मेट्रो लाईन-४(Metroline 4) च्या कारशेडचे काम वेळेत सुरू करण्यासाठी जागेची अत्यंत आवश्यकता आहे. या प्रकल्पासाठी एकूण १७४ एकर जमिनीचा प्रश्न निर्माण झाला होता. यातील १६७ शेतकऱ्यांना पूर्वी वहिवाटीसाठी १०४ एकर जमीन देण्यात आली होती. ही जमीन आता आपल्या नावावर करून ती 'वर्ग-१' मध्ये समाविष्ट करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. मात्र, शासनाने हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.



बैठकीत महसूल अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ही जमीन वर्ग-१ करायची झाल्यास नियमानुसार शासनाचे पैसे भरावे लागतील. शासकीय मूल्यांकनानुसार या जमिनीची किंमत २९५ कोटी रुपये असली, तरी तिचे चालू बाजारमूल्य तब्बल २००० कोटी रुपयांच्या घरात आहे. एवढ्या मोठ्या मूल्याची जागा नियमाबाहेर जाऊन देता येणार नाही, अशी भूमिका प्रशासनाने घेतली. या पार्श्वभूमीवर धोरणात्मक निर्णय घेतला असून,मेट्रो कारशेडचे काम जनहिताचे असल्याने शेतकऱ्यांना ही जागा वर्ग-१ करून दिली जाणार नाही, असे महसूलमंत्र्यांनी सांगितले.

वर्ग-२ च्या जमिनी रडारवर



शासकीय जमिनींचा गैरवापर आणि अटींचे उल्लंघन रोखण्यासाठी महसूलमंत्र्यांनी बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्देश दिले. त्यानुसार, राज्यातील सर्व वर्ग-२ च्या जमिनींची सविस्तर आणि अचूक माहिती गोळा करावी. ज्या जमिनींचे कायदेशीर वाटप झाले असेल, त्यांनी ती जमीन वर्ग-१ करून घ्यावी; मात्र त्यासाठी लागणारी संपूर्ण दंडाची रक्कम संबंधितांकडून कडकपणे वसूल करण्यात यावी.

Comments
Add Comment

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा