Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये कारवाईचा धडाका सुरूच ! झेडपीच्या पाणीपुरवठा विभागातील सहा अभियंते निलंबित

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये कारवाईचा धडाका सुरूच असल्याचे पुन्हा एका घटनेतून अधोरेखित झाले आहे. ‘जलजीवन मिशन’अंतर्गत राबविण्यात आलेल्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनांतील अनियमितता, निकृष्ट दर्जाची कामे आणि शासनाच्या निधीचा अपव्यय झाल्याप्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या चार अधिकाऱ्यांनंतर आता जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील सहा अभियंत्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यात एकूण दहा अभियंत्यांवर कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. (Maharashtra Water Supply Engineers Suspended)



प्रकरणाच्या चौकशीसाठी सात सदस्यीय समिती


या प्रकरणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे पाटील यांनी चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार शासनाने सात सदस्यीय समिती नियुक्त केली आणि त्यानंतर विविध पाणीपुरवठा योजनांची तपासणी करण्यात आली. मागील आठवड्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता, तत्कालीन कार्यकारी अभियंता, संगमनेर विभागाचे कार्यकारी अभियंता आणि नेवासा उपविभागाचे उपअभियंता यांचे निलंबन करण्यात आले होते. (Maharashtra Water Supply Engineers Suspended)



पाणीपुरवठा योजनांच्या कामांमध्ये अनियमितता


संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर व सांगवी रेट्रोफिटिंग पाणीपुरवठा योजना ,शेवगाव तालुक्यातील हातगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी, कारेगाव रेट्रोफिटिंग, काळेवाडी आणि पत्र्याचा तांडा पाणीपुरवठा योजना, राहुरी तालुक्यातील मनोरी, करजगाव, तांदूळवाडी, पिंपळगाव फुंगी आणि गणेगाव रेट्रोफिटिंग पाणीपुरवठा योजना, तसेच श्रीरामपूर तालुक्यातील उंबरगाव रेट्रोफिटिंग, निमगाव खैरी आणि राहाता तालुक्यातील गोगलगाव रेट्रोफिटिंग पाणीपुरवठा योजनांच्या कामांमध्ये अनियमितता, गंभीर प्रकारच्या त्रुटी आढळून आल्या. (Maharashtra Water Supply Engineers Suspended)



पाणीपुरवठा विभागातील सहा अभियंते निलंबित


या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एच. बी. चव्हाण, तत्कालीन प्रभारी कार्यकारी अभियंता एस. एस. गडधे, उपअभियंता पी. आर. संवत्सरकर, उपअभियंता आर. पी. पीसे, तत्कालीन शाखा अभियंता डी. व्ही. परदेशी आणि तत्कालीन उपअभियंता पी. बी. जायभाये यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव रंगा नायक यांनी निलंबित केले आहे.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Ashok Kharat Case : मोठी अपडेट ! भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, सरकार पक्षातर्फे उज्ज्वल निकम बाजू मांडणार

Ashok Kharat Case : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने सर्वानाच हादरवून सोडले होते. भविष्य सांगण्याचा बहाणा करत भोंदू

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Nepal Floods : नेपाळच्या महापुरात बँक बुडाली, पण आत सापडला कोट्यवधींचा खजिना; ५० कोटींचे सोने, रोकड आणि चांदी सुरक्षित बाहेर

काठमांडू : नेपाळमध्ये भोटेकोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणात हाहाकार माजला आहे. पूर आणि

Delhi Gang Rape : धक्कादायक! दिल्लीतील स्लीपर बसमध्ये 16 वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; चालक आणि वाहकाला अटक

नवी दिल्ली : दिल्लीच्या काश्मिरी गेट परिसरात स्लीपर बसमध्ये 16 वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार झाल्याची