Smriti Mandhana : लॉर्ड्सवर स्मृती मंधानाचा ऐतिहासिक विक्रम! ३०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी भारताची तिसरी महिला क्रिकेटपटू

लंडन : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार सलामीवीर स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिने लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर आणखी एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात मैदानात उतरताच मंधानाने भारतासाठी ३०० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला. हा मान मिळवणारी ती भारताची तिसरी महिला क्रिकेटपटू आणि एकूण १२वी भारतीय क्रिकेटपटू ठरली आहे. (Smriti Mandhana)


भारतीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम सध्याची कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या नावावर आहे. हरमनप्रीतने आतापर्यंत ३७४ आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, माजी कर्णधार मिताली राज ३३३ सामन्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आता स्मृती मंधानाने ३०० सामन्यांचा टप्पा पार करत या प्रतिष्ठित यादीत आपले नाव कोरले आहे. (Smriti Mandhana)



स्मृती मंधानाने भारतासाठी आतापर्यंत ९ कसोटी, १२० एकदिवसीय आणि १७१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तिच्या फलंदाजीने भारतीय महिला क्रिकेटला नवी ओळख मिळवून दिली आहे. तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत मंधानाने कसोटीत ६९१ धावा, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५४११ धावा, तर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४५३८ धावा केल्या आहेत. तिच्या नावावर कसोटीत २ शतके व ४ अर्धशतके, एकदिवसीय क्रिकेटमध्ये १४ शतके व ३५ अर्धशतके, तर टी-२० मध्ये १ शतक आणि ३५ अर्धशतके आहेत. (Smriti Mandhana)



भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या महिला क्रिकेटपटू : 
हरमनप्रीत कौर – ३७४ सामने
मिताली राज – ३३३ सामने
स्मृती मंधाना – ३०० सामने
झुलन गोस्वामी – २८४ सामने
दीप्ती शर्मा – २८० सामने (Smriti Mandhana)



लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर ३०० सामन्यांचा टप्पा गाठत स्मृती मंधानाने भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासात आणखी एक सुवर्ण अध्याय लिहिला आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल क्रिकेटविश्वातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. (Smriti Mandhana)

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून