'Dhamaal 4' Movie : 'धमाल 4'चा बॉक्स ऑफिसवर धडाका; विकेंडला ६० कोटींचा टप्पा गाठण्याची शक्यता

मुंबई : अजय देवगण (Ajay Devgn) स्टारर 'धमाल 4' (Dhamaal 4) बॉक्स ऑफिसवर (Box Office) हिट (Hit) ठरण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी चित्रपटाच्या कमाईत (Collection) मोठी वाढ झाली असून, संध्याकाळच्या शोपर्यंत (Evening Shows) पहिल्या दिवसाच्या तुलनेत तब्बल ६५ ते ७० टक्क्यांची वाढ दिसून आली.


यामुळे दिवसभरात चित्रपट २३ ते २४ कोटी रुपयांचे नेट कलेक्शन (Net Collection) करेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, रात्रीच्या शोमध्ये वाढीचा वेग काहीसा कमी होण्याची शक्यता असल्याने अखेरचा आकडा सुमारे २२ कोटी रुपये नेट, तर किमान २१ कोटी रुपये नेट इतका राहण्याचा अंदाज आहे. शुक्रवारीच्या तुलनेत ही ५५ ते ६० टक्क्यांची वाढ मानली जात आहे. दोन दिवसांत 'धमाल 4'चे एकूण नेट कलेक्शन (Total Net Collection) सुमारे ३६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.


विशेष म्हणजे, याआधी प्रदर्शित झालेल्या 'Welcome to the Jungle' चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईत ३५ टक्के वाढ झाली होती, तर'Bhooth Bangla'ने ५५ टक्क्यांची वाढ नोंदवली होती. त्या तुलनेत'धमाल 4'ची कामगिरी अधिक प्रभावी मानली जात आहे.



कौटुंबिक मनोरंजन (Family Entertainer) असलेल्या या चित्रपटाला रविवारी आणखी मोठी उभारी मिळण्याची शक्यता आहे.'Welcome to the Jungle'च्या रविवारीच्या कमाईत सुमारे २० टक्क्यांची वाढ झाली होती. त्याच धर्तीवर'धमाल 4'नेही कामगिरी केल्यास पहिल्या विकेंडचे (Weekend) एकूण कलेक्शन ६० कोटी रुपयांपेक्षा अधिक होऊ शकते.


चित्रपटाला सुरुवातीच्या दिवशी अपेक्षेपेक्षा कमी ओपनिंग (Opening) मिळाली असली, तरी दुसऱ्या दिवसाची वाढ त्याला हिट (Hit) ठरण्याच्या दिशेने घेऊन जात आहे. मात्र, चित्रपटाचे भवितव्य ठरवण्यात आठवड्याच्या कामकाजाच्या दिवसांतील (Weekdays) कमाई महत्त्वाची ठरणार आहे. जर सोमवारपासून कमाईत मोठी घसरण झाली नाही, तर 'धमाल 4' बॉक्स ऑफिसवर दीर्घकाळ मजबूत कामगिरी करू शकतो. याशिवाय, महिन्याच्या अखेरीस प्रदर्शित होणाऱ्या 'Spider-Man: Brand New Day'पूर्वी 'धमाल 4'ला जवळपास तीन आठवड्यांचा खुला रन (Open Run) मिळणार असल्याने, या कालावधीचा चित्रपटाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

BMC Health Policy : शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य योजनांचा लाभ, नागरी आरोग्य धोरणाचा मसुदा सार्वजनिक आरोग्य समितीसमोर सादर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) BMC Health Policy : निरोगी मुंबई आणि भविष्यकालीन सज्जतेसाठी मुंबई महानगरपालिकेने नागरी आरोग्य

BMC Water Pipeline Leakage : पाणी गळती दुरुस्तीच्या कामांसाठी घाटकोपरला २७ कोटींचा ‘बूस्टर’!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर भागातील जलवाहिनीतून होणारी पाण्याची गळती रोखण्यासाठी महापालिकेच्या जल

Kandivali : स्वामी विवेकानंद मार्ग जंक्शन बस अपघातातील जखमी युवकावर कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात उपचारास नकार!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मालाड – मार्वे रोड, स्वामी विवेकानंद मार्ग जंक्शन येथे झालेल्या भीषण बस अपघातात २१

Kandivali : कांदिवलीतील डॉ.बाबासाहेब रुग्णालयातील साहित्य खरेदीत गैरव्यवहार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या कांदिवलीतील (Kandivali) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापालिका

BMC : घाटकोपर, मानखुर्द चेंबूर परिसरातील ०६ अनधिकृत लॉजवर जप्तीची कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) अनधिकृत व्यवसाय आणि नियमबाह्य बांधकामांविरोधात महानगरपालिकेकडून कारवाई सुरू आहे. या

मुंबईत ५१ दिवसांमध्ये १६,१५३ बॅनरांची फाडाफाडी

मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्या बॅनरबाजांवर महापालिकेच्यावतीने कारवाई केली जात असून