Mumbai Crime : संतापजनक! मुंबईत सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार, संतप्त नागरिकांचा रस्ता रोको आंदोलन


मुंबई : मुंबई (Mumbai) येथील पायधुनी परिसरात अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका ७ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार (Sexual assault) झाल्याची माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. इमारतीच्या वॉचमनने हे संतापजनक कृत्य केल्याची माहिती मिळाली आहे. खेळता खेळता ती इमारतीच्या वॉशरुममध्ये गेली. मुलगी एकटी असल्याचे पाहून तिथे गोडाऊनमध्ये काम करणाऱ्या सुरक्षारक्षकाची नियत फिरली. त्याने मागून जाऊन चिमुरडीवर अत्याचार केला. घटनेची माहिती मिळताच पीडित मुलीला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. सध्या तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.



या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आपला निषेध नोंदवला. संतप्त झालेल्या जमावाने पायधुनी पोलीस (pydhonie police station) ठाण्याला घेराव घातला आणि आरोपीला तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. नागरिकांचा संताप इतका वाढला होता की, त्यांनी रस्त्यावर उतरून 'रस्ता रोको' आंदोलन सुरू केले. यावेळी आंदोलकांनी पोलीस आणि प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली, ज्यामुळे परिसरातील वातावरण कमालीचे तापले होते.


घटनेचे गांभीर्य ओळखून आणि कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने तात्काळ पावले उचलली आहेत. पोलीस ठाणे आणि संपूर्ण पायधुनी परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलीस वरिष्ठ अधिकारी नागरिकांना शांततेचे आवाहन करत आहेत. दरम्यान, पीडित चिमुरडीला तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.



या संपूर्ण प्रकरणाबाबत पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संशयित आरोपीचा शोध घेऊन त्याला कठोर कायदेशीर शिक्षा केली जाईल, असे आश्वासन पोलिसांकडून दिले जात आहे. पोलीस सध्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असून परिसरात शांतता राखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे महिला आणि बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.



Comments
Add Comment

वैद्यकीय तज्ज्ञांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिले आरोग्याचे धडे, ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमाला तरूण- तरूणींचा उत्सफुर्त प्रतिसाद

मुंबई: बदलती जीवनशैली, मोबाईलचा वाढता वापर, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी आणि मानसिक ताण या वेगवेगळ्या

मुंबईत दीड वर्षांच्या मुलीला सहाव्या मजल्यावरून ढकललं, आरोपीच्या आईनं पुरावे नष्ट करण्यासाठी वापरली शक्कल

मुंबई: मुंबईतल्या गोरेगाव पूर्वेतील दिंडोशी परिसरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोरेगाव पूर्वेतील

abvp protest mumbai university : ‘बांगलादेशसारख्या अराजकतेला भारतात थारा नको!’; संविधानाच्या रक्षणासाठी मुंबई विद्यापीठात अभाविपतर्फे भव्य स्वाक्षरी अभियान व निदर्शने

मुंबई : देशातील लोकशाही व्यवस्था मजबूत राखणे, भारतीय संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करणे आणि राष्ट्रीय एकात्मता

Virar News: विरारमध्ये ज्युनिअर आर्टिस्टची आत्महत्या, अश्लील व्हिडिओंच्या आधारे कोट्यवधींची खंडणी उकळल्याचा आरोप

विरार: अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी उकळल्याच्या प्रकाराला कंटाळून

Versova Beach Dead Body : वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर गोणीत सापडला मृतदेह; 6 आरोपींना अटक

मुंबई : मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर 1 ऑक्टोबर रोजी गोणीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले