Latur Viral Video : वायर चोरीच्या आरोपावरून तीन अल्पवयीन मुलांना खांबाला बांधून अमानुष मारहाण

लातूर : लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील खरोळा येथे वायर चोरीच्या आरोपावरून तीन अल्पवयीन मुलांना लोखंडी खांबाला बांधून अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आणि संबंधिता विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात रेणापूर पोलिसांनी चोरीचा आरोप असलेल्या अल्पवयीन मुलांविरुद्ध तसेच मारहाण करणाऱ्या शेतकऱ्यांविरुद्ध परस्पर गुन्हे दाखल केले आहेत.(Latur News)



मिळालेल्या माहितीनुसार, खरोळा येथील गट क्रमांक ४५० मध्ये शेतकरी नारायण राऊतराव यांची शेती आहे. या परिसरात अनेक दिवसांपासून इलेक्ट्रिक मोटारी, बोअरच्या केबल वायर तसेच शेतीसाठी वापरण्यात येणारे साहित्य चोरीला जात असल्याने शेतकरी त्रस्त झाले होते.


शुक्रवारी दुपारच्या सुमारास तीन अल्पवयीन मुले शेतातील पाणबुडी मोटार व बोअरचे केबल वायर घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर इतर शेतकऱ्यांच्या मदतीने या तिघांना पकडण्यात आले. या प्रकरणी सुमारे १६ हजार रुपयांच्या साहित्य चोरीची तक्रार नारायण राऊतराव यांनी रेणापूर पोलिसांत दिली असून, त्यावरून अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Viral Video)



मात्र, पोलिसांत तक्रार दाखल करण्यापूर्वीच संबंधित मुलांना लोखंडी खांबाला बांधून पाईप व वायरने बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या मारहाणीत तिन्ही मुले जखमी झाली. मुलांना खांबाला बांधून त्यांच्या पाठीवर, पायांवर आणि मांडीवर मारहाण करण्यात आली. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा विडिओ सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे.


या प्रकरणी सचिन राऊतराव आणि नितीन शिंदे (रा. खरोळा) यांच्याविरुद्ध रेणापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चोरीच्या आरोपाखाली अल्पवयीन मुलांविरुद्ध आणि मारहाणीप्रकरणी संबंधित शेतकऱ्यांविरुद्ध परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले असून, या संपूर्ण घटनेचा पुढील तपास रेणापूर पोलीस करत आहेत.(Crime News)

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''