Vidyavihar Flyover Opens : विद्याविहार येथील उड्डाणपूल पुढील महिन्यात होणार खुला

मानखुर्द महाराष्ट्र नगर उड्डाणपुलाच्या दोन्ही आर्मचे काम येत्या ३१ मे २०२७ पर्यंत पूर्ण होणार


मुंबई : विद्याविहार (Vidyavihar) येथील उड्डाणपूल येत्या ३१ ऑगस्ट २०२६ तर मानखुर्द महाराष्ट्र नगर उड्डाणपुलाच्या (Flyover) दोन्ही आर्मचे काम दिनांक ३१ मे २०२७ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. सध्या या विद्याविहार उड्डाणपुलाचे काम सुमारे ८० टक्के झाले आहे. तर घाटकोपर-मानखुर्द उड्डाणपूला वरून थेट वाशीकडे जाणारा आर्म - १ आणि सायन पनवेलच्या महामार्गावरील मानखुर्द उड्डाणपू लाचे काम ३३ टक्के पूर्ण झाले आहे.

विद्याविहार रेल्वे स्थानक येथे उड्डाणपूल तसेच मानखुर्द महाराष्ट्र नगर उड्डाणपुल प्रकल्पाची कामे वेगाने सुरु आहेत. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी शनिवारी ११ जुलै २०२६ रोजी सकाळी या दोन्ही ठिकाणांना भेट देऊन प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी प्रमुख अभियंता (पूल) राजेश मुळे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.



विद्याविहार उड्डाणपुलाचे काम सुमारे ८० टक्के झाले आहे. येत्या ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत या पुलाचे काम पूर्ण करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त बांगर यांनी दिले. विद्याविहार पूर्वेला तसेच पश्चिमेला पोहच रस्त्याच्या ठिकाणी वाहतूक व्यवस्था नियोजन करण्यासाठी एन विभागाचे अधिकारी, उद्यान व वाहतूक पोलीस यांच्या समन्वयाने नियोजन करावे. पुलाच्या पूर्व तसेच पश्चिम दिशेला वाहतुकीसाठी अडथळा ठरणारी ठिकाणे, आस्थापना, पदपथ, झाडे यांच्याशी संबंधित सुनियोजन करावे. अधिक गर्दीच्या वेळेत पुलाच्या पोहच रस्त्यापासून वाहतूक कोंडी होणार नाही, यादृष्टीने नियोजन करावे, असेही अभिजित बांगर यांनी निर्देश दिले.

मानखुर्द - महाराष्ट्र नगर आणि मानखुर्द - महाराष्ट्र नगर टी जंक्शन येथे नियमित सकाळी आणि रात्री मोठ्या स्वरूपात वाहतूक कोंडी (Trafiic Jam) होते. परिणामी स्थानिक रहिवाशासह मुंबईवरून वाशीकडे तसेच वाशीकडून (Vashi) मुंबईकडे (Mumbai) जाणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा मोठ्या स्वरूपात सामना करावा लागतो. यासोबतच घाटकोपर ते मानखुर्द आणि मानखूर्द ते घाटकोपर या मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण होते. यावर परिणामकारक उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेने घाटकोपर-मानखुर्द उड्डाणपूला वरून थेट वाशीकडे जाणारा आर्म - १ आणि सायन पनवेलच्या महामार्गावरील मानखुर्द उड्डाणपूल येथून घाटकोपरकडे (Ghatkopar) जाणारा आर्म- २ उड्डाणपूल अशी स्वतंत्र मार्गिका तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.



अतिरिक्त मनुष्यबळ आणि संयंत्रे वापरून दोन्ही आर्मचे काम ३१ मे २०२७ पर्यंत पूर्ण करावे. प्रकल्पाची अंमलबजावणी करताना कामगार- कर्मचारी आणि नागरिकांच्या सुरक्षेचे सर्व उपाय करावेत. सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, असे सक्त निर्देश अभिजित बांगर यांनी दिले. पूल प्रकल्पाच्या अनुषंगाने महावितरण व टाटा पॉवर यांच्या पारेषण वाहिन्यांच्या स्थलांतराच्या कामाचा आढावाही बांगर यांनी घेतला.

या दोन्ही उड्डाणपुलांमुळे सायन-पनवेल महामार्गावरील टी-जंक्शनवरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊन वाहतुकीचा प्रवाह अधिक गतिमान होण्यास मदत होईल. . या पूल प्रकल्पाचे काम ३१ मे २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. दिनांक १५. ऑक्टोबर २०२४ पासून प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. सद्यस्थितीत या प्रकल्पाचे सुमारे ३३ टक्के काम पूर्ण झाले असून

मानखुर्द महाराष्ट्र नगर उड्डाणपूल प्रकल्पाची माहिती


प्रस्तावित आराखड्यानुसार उड्डाणपूल आर्म-१ हा घाटकोपर-मानखुर्द जोड मार्ग (GMLR) उड्डाणपुलावरून वाशीकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी स्वतंत्र दोन-लेनचा, १,४२० मीटर लांबीचा व ८.५ मीटर रुंदीचा मार्ग उपलब्ध करून देणार आहे, तर उड्डाणपूल आर्म २ हा वाशीकडून येणाऱ्या वाहनांना विद्यमान घाटकोपर-मानखुर्द जोड मार्ग उड्डाणपुलावर जाण्यासाठी दुसऱ्या स्तरावरील स्वतंत्र दोन-लेनचा, १,९५१ मीटर लांबीचा व ८.५ मीटर रुंदीचा उड्डाणपूल उपलब्ध करून देणार आहे.

विद्याविहार पूल प्रकल्पाची माहिती


लालबहादूर शास्त्री मार्ग व रामचंद्र चेंबूरकर मार्ग यांना जोडणारा हा उड्डाणपूल एकूण दोन मार्गिकांचा आहे. एकूण ६५० मीटर लांबीच्या या प्रकल्पात रेल्वे रुळांवर १०० मीटर पूल, तर पूर्व बाजूस २२० मीटर आणि पश्चिम बाजूला ३३० मीटर पोहोच मार्ग बांधण्यात येत आहे. या उड्डाण पुलावरून विद्याविहार रेल्वे स्थानकाच्या पदपथांवर जाण्यासाठी जोडमार्ग देखील दिला जात आहे. त्यासोबतच दोन्ही बाजूचे रेल्वे तिकीट खिडकी कक्ष, स्थानक मास्तर कार्यालय, जीना यांची देखील पुनर्बांधणी केली आहे. रेल्वे हद्दीत जिन्याद्वारे पादचारी मार्ग उप-रस्त्याला जोडला जात आहे.
Comments
Add Comment

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा