Dadar Savarkar Mandai : दादर पश्चिम येथील सावरकर मंडईच्या दुरुस्तीचा अखेर मुहूर्त सापडला

मुंबई ( विशेष प्रतिनिधी)


दादर पश्चिम येथील मागील अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर मंडईच्या (Dadar Savarkar Mandai) दुरुस्तीच्या मुहूर्त अखेर सापडला. या मार्केटच्या दुरुस्ती कामाला अखेर सुरुवात केले जाणार आहे. या मंडईच्या पुनर्विकास करण्याचं काम निश्चित झाले होते. मात्र खाजगी विकासका मार्फत केले जाणारे काम पुढे रद्द करून याचा विकास महापालिकेच्या वतीने करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर या मार्केटची अद्यापही दुरुस्ती झाली नव्हती.


दादर पश्चिम स्वातंत्र्यवीर सावरकर महापालिका मंडई (Dadar Savarkar Mandai) ही सहाय्यक आयुक्त (बाजार) विभागाच्या मालकीची आहे. या मंडईचे संरचनात्मक परिक्षण बाजार विभागामार्फत करण्यात आल्यानंतर ही मंडई ही सी-२ बी प्रवर्गात मोडत असल्याचे स्ट्रक्चरल ऑडिट अहवालात दिसून आले. या मध्ये मुख्य दुरुस्त्या सुचवल्या आहेत. ही मंडई ही तळमजल्याची असून ४६ वर्ष जुनी आहे.



स्वातंत्र्यवीर सावरकर मंडईची संरचनात्मक दुरुस्ती कामासाठी मेसर्स विकाश एन्टरप्राईझेस या कंपनीची निवड करण्यात आली असून यासाठी दोन कोटी सेहेचाळीस लाख एकोणीस हजार चारशे शहाण्णव एवढा खर्च केला जाणार आहे.


गाळेधारकांची संख्या: सावरकर मंडईमध्ये (Dadar Savarkar Mandai) अधिकृतपणे नोंदणीकृत असलेले साधारणपणे ३०० हून अधिक मुख्य गाळेधारक व्यवसाय करतात. येथे प्रामुख्याने किरकोळ व घाऊक भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते, कोळी बांधव व भगिनी (मासे विक्रेते), चिकन-मटण विक्रेते, तसेच काही प्रमाणात किराणा व किरकोळ गृहोपयोगी वस्तूंचे गाळे आहेत. (Dadar Savarkar Mandai)



कोणती कामे केली जाणार आहेत ?


छताकरिता गॅल्व्हॅल्युम पत्रे बसविणे व त्याकरिता आवश्यक लोखंडी व लाकडी ट्रसची उभारणी करणे,


अंतर्गत तसेच बाह्य भागास आवश्यकतेनुसार सिमेंट गिलाव्याची कामे.


प्लास्टिक पाण्याची टाकी बसविणे.


रंगकाम करणे.


वीट बांधकाम करणे.


प्लंबींगची व ड्रेनेजची कामे करणे.


आवश्यकतेनुसार छताकरिता लोखंडी कॉलम उभे करणे व त्याकरिता
कॉन्क्रीटची पायाभरणी करणे.


लोखंडी गेट व जाळी बसविणे.


लादीकरण करणे.


दरवाजे व खिडक्यांची कामे करणे.


स्टीलची कामे करणे.


वाळवी प्रतिबंधक उपाय योजना करणे.


रेन वॉटर गटरची दुरूस्ती करणे.


केबल, वायर बदली करणे, पॉईन्ट वायरींग, विदयुत स्वीच, एल.ई.डी. लाईट आदी विद्युत कामे


Comments
Add Comment

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी