Delhi Crime : भयंकर! वाढदिवशीच पत्नीची गोळ्या झाडून हत्या; आरोपी पोलीस कॉन्स्टेबल फरार

दिल्ली : दिल्लीत नेमकं चालंय तरी काय? गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे अशातच एका पोलीस कॉन्स्टेबलने आपल्या पत्नीची हत्या केल्याचे घटना समोर आली आहे.  दिल्लीच्या पूर्व भागातील कल्याणपुरी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. पतीने आपल्या पत्नीच्या वाढदिवशीच तिची हत्या केली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मनीष भाटी हे दिल्ली पोलिसांच्या पूर्व जिल्ह्यातील वाहनचोरी प्रतिबंधक पथकात कार्यरत आहेत. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी पहाटे सुमारे ३ वाजता लाल बहादूर शास्त्री (एलबीएस) रुग्णालयाजवळ त्यांनी पत्नी प्रियांका यांच्यावर गोळी झाडली आणि घटनास्थळावरून पसार झाले.



मनीष आणि प्रियांका यांचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. ते विनोद नगर परिसरात राहत होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघेही पहाटे २ वाजण्याच्या सुमारास स्कूटरवरून घराबाहेर पडल्याचे दिसून आले आहे. एलबीएस रुग्णालयाजवळ त्यांच्यात वाद झाल्यानंतर ही घटना घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.


गोळीबारानंतर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या प्रियांका यांना एका ऑटोचालकाने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


घटनेनंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके तयार केली असून, त्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे.



दरम्यान, प्रियांका या अशोक विहार येथील एका खासगी शाळेत शिक्षिका होत्या. त्यांच्या कुटुंबीयांनी आरोपीवर हुंड्याची मागणी आणि मानसिक छळाचे आरोप केले आहेत. २०२४ मध्येही या कारणावरून दोघांमध्ये वाद झाल्यानंतर प्रियांका सुमारे आठ महिने भावाकडे राहत होत्या, अशी माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.


या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून व्यापक मोहीम राबवली जात आहे.

Comments
Add Comment

Saurabh Rajput Murder Case : सौरभ राजपूत हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा; निर्भया प्रकरणातील जल्लाद पवन यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Saurabh Rajput Murder Case: मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम