Mumbai News : धक्कादायक! अंधेरीच्या लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू, पोलीस तपास सुरु


मुंबई : मुंबई (Mumbai) येथील अंधेरी पूर्व परिसरात एका लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू (Death) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शालिमार लॉजमध्ये घडलेल्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.



मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एक तरुण आणि तरुणी या लॉजमध्ये मुक्कामासाठी आले होते. तिथे त्यांनी जेवणासाठी बिर्याणी मागवली होती. मात्र, बिर्याणी खाल्ल्यानंतर काही वेळातच तरुणीला अचानक उलट्यांचा त्रास सुरू झाला आणि तिची प्रकृती वेगाने बिघडू लागली. हे पाहून तिच्यासोबत असलेल्या तरुणाने घाबरून लॉजमधील कर्मचाऱ्यांकडे मदतीची मागणी केली. लॉज प्रशासनाने या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना दिली.



माहिती मिळताच अंधेरी पोलीस ठाण्याचे (Andheri Police Station) पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तरुणीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली, परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी तरुणीचा मृतदेह ताब्यात घेऊन तो उत्तरीय तपासासाठी पाठवला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकणार आहे.


हा प्रकार प्रेमसंबंधातून घडलेली हत्या आहे, अन्नबाधेतून (Food Poison) झालेला अपघात आहे की यामागे इतर काही कारण आहे, याबाबत अद्याप कोणताही अधिकृत खुलासा झालेला नाही. अंधेरी पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून लॉजमधील कर्मचाऱ्यांची आणि सोबत असलेल्या तरुणाची चौकशी केली जात आहे. पोलीस या मृत्यूचे गूढ उकलण्याचा प्रयत्न करत आहेत.



Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने