Goregaon Mulund Link Road : गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचा पहिला उड्डाणपूल सप्टेंबरमध्ये वाहतुकीसाठी खुला होणार

मुंबई : मुंबईतील (Mumbai) वाहतूक कोंडी (Traffic) कमी करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (Goregaon Mulund Link Road) प्रकल्पातील पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, दिंडोशी कोर्ट ते गोरेगाव फिल्मसिटीदरम्यानचा उड्डाणपूल सप्टेंबर २०२६ मध्ये वाहतुकीसाठी खुला होणार आहे.



हा उड्डाणपूल सुमारे १.२ किलोमीटर लांबीचा असून, पश्चिम द्रुतगती महामार्गालगतच्या दिंडोशी कोर्टापासून सुरू होऊन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ संपतो. उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर पश्चिम उपनगरातील वाहनचालकांना वाहतुकीसाठी आणखी एक पर्यायी मार्ग उपलब्ध होणार असून, पश्चिम द्रुतगती महामार्गावरील ताण कमी होण्यास मदत होईल. (Mumbai Traffic)


गोरेगाव-मुलुंड लिंक रोड हा एकूण १२.२ किलोमीटर लांबीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, त्यामध्ये उड्डाणपूल, जुळ्या भुयारी बोगद्यांसह विविध इंटरचेंजचा समावेश आहे. पुढील टप्प्यात या उड्डाणपुलाला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्यांशी जोडण्यात येणार आहे. या बोगद्यांचे काम २०२७ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.



प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर गोरेगाव आणि मुलुंडदरम्यानचा प्रवास अधिक जलद होणार असून, पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. (Road Infrastructure)


महापालिकेनुसार, उड्डाणपुलाचे मुख्य बांधकाम पूर्ण झाले असून सध्या डांबरीकरण, सिग्नल यंत्रणा, दिशादर्शक फलक आणि अन्य अंतिम कामे सुरू आहेत. संपूर्ण गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्प २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पाची एकूण अंदाजित किंमत सुमारे १४ हजार कोटी रुपये असून, पहिल्या उड्डाणपुलासाठी सुमारे ३०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा