Chembur Tree Incident : चेंबूर झाड दुर्घटना: रस्ते आणि उद्यान विभागाला क्लीन चिट

- रस्ते कंत्राटदाराला आणि सल्लागाराला प्रत्येकी पाच आणि दोन लाखांचा दंड


मुंबई ( विशेष प्रतिनिधी)


चेंबूर (पश्चिम) येथील डायमंड गार्डनजवळ दिनांक ३० जून २०२६ रोजी शाळेच्या बसवर पिंपळ प्रजातीचा वृक्ष मुळासकट उन्मळून पडून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती अहवाल रस्ते कंत्राटदारांची सहिसलामत सुटका करण्यात आली आहे. रस्त्यालगत पर्जन्य जलवाहिनीचे काम करताना रस्ते विभागाने योग्य ती काळजी घेतली. त्यामुळे या झाड दुर्घटना प्रकरणी रस्ते विभागासह उद्यान विभागाला क्लीन चिट देण्यात आली आहे. मात्र,झाड पडण्याबाबतच्या विविध संभाव्य कारणांपैकी, कंत्राटदाराने पुरेशी खबरदारी न घेणे हे एक कारण असू शकते. यास्तव, कंत्राटदार मे. गवार कन्स्ट्रक्शन लिमिटेड यांना ५ लाख रुपयांचा दंड करण्याचे तसेच रस्ते सल्लागार महिमतुरा यांना २ लाख रुपयांचा दंड नियुक्त समितीने सुचवला आहे. (Chembur Tree Incident)


चेंबूर पश्चिम परिसरात शाळेच्या बसवर दिनांक ३० जून २०२६ रोजी दुपारी पिंपळ प्रजातीचा वृक्ष मुळासकट उन्मळून पडल्याने झालेल्या अपघाताची सखोल चौकशी करण्यासाठी मुंबई महागनरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) पुरुषोत्तम माळवदे, उप आयुक्त (अभियांत्रिकी) शशांक भोरे यांची समिती गठीत केली होती. या समितीने उद्यानविद्या व लॅण्डस्केप सल्लागार रॉबर्ट फर्नांडिस यांच्या सोबत मागील ३ जुलै २०२६ रोजी घटनास्थळाची संयुक्त पाहणी करून सविस्तर अहवाल तयार केला आहे. या झाड दुर्घटना प्रकरणी उद्यान अधिक्षक जगदीश भोईर, दुय्यम अभियंता (रस्ते) अरुण मुंढे यांच्यासह तीन जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच संबंधित कंत्राटदाराविरोधातही कठोर कारवाई करण्यात आली होती. (Chembur Tree Incident)



याप्रकरणी नियुक्त चौकशी समितीने मांडलेले निष्कर्ष असा नोंदवला आहे की,मान्सूनपूर्व झाडांची आवश्यकतेनुसार छाटणी केली. तसेच, चेंबूर (प) येथील संबंधित झाडाजवळ पर्जन्यजलवाहिनीचे जानेवारी २०२५ ते मार्च २०२५ दरम्यान काम सुरू होते. या कामांबाबत उद्यान विभागाने रस्ते विभागाला वेळोवेळी कळविले होते. त्यामुळे प्रस्तुत प्रकरणी घडलेल्या दुर्घटनेमध्ये उद्यान विभागाचा कोणताही दोष सकृतदर्शनी दिसून येत नसल्याचे समितीने अहवालात नमूद केले आहे. (Chembur Tree Incident)


अस्तित्वात असलेल्या झाडालगत पर्जन्यवाहिनीचे काम करताना सदर झाड पर्जन्यवाहिनीत असल्याचे समोर आले. त्यामुळे पर्जन्यवाहिनी बाधित होत होती. पर्यायाने तेथे पाणी तुंबण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित होण्यासाठी पर्जन्य जलवाहिनीची सातत्यता ठेवण्यासाठी आणि सदर झाड वाचविण्यासाठी झाडाचे परिघ सोडून रस्ते विभागाने सुरक्षित अंतर ठेवून पर्जन्य जलवाहिनीचे बांधकाम केले. जेणेकरुन सदर ठिकाणी पर्जन्यजलवाहिनीचे पाणी तुंबणार नाही. यास्तव, रस्ते विभागाने योग्य ती काळजी सदर प्रकरणी घेतल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे प्रस्तुत प्रकरणी घडलेल्या दुर्घटनेस रस्ते विभागाचा देखील कोणताही दोष सकृतदर्शनी दिसून येत नाही, असे चौकशी समिती अहवालात म्हटले आहे. (Chembur Tree Incident)


उद्यान विभागाने झाडांच्या सुरक्षिततेबाबत रस्ते विभागाला ९ एप्रिल २०२५ व २७ जानेवारी २०२६ रोजी कळविले होते. त्यानुसार रस्ते विभागाने याबाबत संबंधित कंत्राटदार मे. गवार कन्स्ट्रक्शन लिमिटेड यांना दिनांक ९ मार्च २०२६ रोजी सूचित केल्यानुसार कंत्राटदाराने पुरेशी खबरदारी घेतली नसल्याचे सकृतदर्शनी आढळून येते. परंतु, वनस्पतीशास्त्र/उद्यानशास्त्र तज्ज्ञ, उद्यानविद्या व लॅडस्केप सल्लागार यांनी संबंधित झाड पडल्याबाबत त्यांच्या अहवालात विषद केलेली विविध कारणे आणि सदर झाड पडल्यापासून म्हणजेच २८ जून २०२६ ते ५ जुलै २०२६ या कालावधीत मुंबईमधील विविध रस्त्यांवरील तसेच उद्यानातील मोकळ्या जागांवरील सुमारे १ हजार १५८ झाडे/फांद्या देखील पडल्याच्या अनेक घटना घडल्या. ही बाब समितीने विचारात घेतली आहे. त्यामुळे कंत्राटदार मे. गवार कन्स्ट्रक्शन लिमिटेड यांना पूर्णपणे दोषी धरणे उचित होणार नाही. तरीही, मे. गवार कन्स्ट्रक्शन लिमिटेड यांना रस्ते विभागाने झाडाजवळील उत्खनन करताना काळजी घेण्याबाबत तसेच याचे काम करताना कोणतीही घटना किंवा नुकसान झाल्यास त्या सर्व परिणांमासाठी कंत्राटदार पूर्णपणे जबाबदार आणि उत्तरदायी असेल असे पत्र पाठविले होते. त्यानुसार संबंधित कंत्राटदाराने योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे होते. त्यानुसार, वनस्पतीशास्त्र/उद्यानशास्त्र तज्ज्ञ यांच्या अहवालात नमूद केल्याप्रमाणे झाड पडण्याबाबतच्या विविध संभाव्य कारणांपैकी, कंत्राटदाराने पुरेशी खबरदारी न घेणे हे एक कारण असू शकते. त्यामुळे, कंत्राटदार मे. गवार कन्स्ट्रक्शन लिमिटेड यांना ५ लाख रुपयांचा दंड करण्याचे समितीने अहवालात सुचवला आहे. (Chembur Tree Incident)



रस्ते विभागाने सादर केलेल्या माहितीनुसार सदर कामावर परिपूर्ण देखरेख व निरीक्षण तसेच तांत्रिक पर्यवेक्षणासाठी मे. माहिमतुरा कंन्सलटंट यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या कामाच्या व्याप्तीनुसार त्यांनीही वेळोवेळी कंत्राटदाराला योग्य त्या सूचना देऊन झाडांची स्थैर्यता (स्टॅबिलिटी) अबाधित राखणे गरजेचे होते. तरीही, अहवालात नमूद केल्याप्रमाणे झाड पडण्याबाबतच्या विविध संभाव्य कारणांपैकी, कन्सलटंट यांनी पुरेशी खबरदारी न घेणे हे एक कारण असू शकते व कंत्राटदाराच्या या कामावर पुरेशी देखरेख ठेवून त्यातील त्रुटी निदर्शनास आणून देण्याची खबरदारी मे. माहिमतुरा कन्सलटंट यांनी घेणे गरजेचे होते. त्यामुळे, मे. माहिमतुरा कंन्सलटंट यांनाही २ लाख रुपयांचा दंड करण्याचे समितीने प्रस्तावित केले आहे. (Chembur Tree Incident)

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने