MHADA Lottery 2026 : आनंदवार्ता! आता घराचे स्वप्न होणार साकार; म्हाडाची ५ हजार घरांची मेगा लॉटरी लवकरच

- ठाणे-पनवेलसह 'या' शहरांचा समावेश


मुंबई : स्वतःच्या हक्काच्या घराची वाट पाहणाऱ्या लाखो नागरिकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. म्हाडाच्या कोकण मंडळामार्फत सुमारे ५ हजार घरांची मेगा लॉटरी लवकरच जाहीर होणार असून, ऑगस्टच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात या लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. या लॉटरीत ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल आणि वसई-विरार परिसरातील घरे उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात घर खरेदी करण्याची मोठी संधी मिळणार आहे. (MHADA Lottery 2026)



खासगी विकसकांकडून मिळालेली हजारो घरे :


या लॉटरीतील मोठ्या प्रमाणातील घरे खासगी विकसकांकडून २० टक्के गृहनिर्माण धोरणाअंतर्गत म्हाडाकडे हस्तांतरित झाली आहेत. सध्या म्हाडाकडे जवळपास १,००० घरे उपलब्ध असून, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल आणि वसई-विरार परिसरातून आणखी सुमारे ४,००० घरे उपलब्ध करून घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. (MHADA Lottery 2026)



मागील लॉटरीला ७५ हजार अर्ज :


यापूर्वी म्हाडाच्या मुंबई मंडळाने २,६४० घरांसाठी लॉटरी काढली होती. या लॉटरीसाठी तब्बल ७५ हजार अर्ज प्राप्त झाले होते. मात्र, घरांच्या तुलनेने जास्त किमतींमुळे अपेक्षित प्रमाणात प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे आता नागरिकांचे लक्ष कोकण मंडळाच्या आगामी लॉटरीकडे लागले आहे. (MHADA Lottery 2026)



मध्यमवर्गीयांसाठी सुवर्णसंधी :


मुंबई आणि उपनगरांतील घरांच्या सातत्याने वाढणाऱ्या किमतीमुळे स्वतःचे घर घेणे अनेकांसाठी कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत म्हाडाची लॉटरी ही परवडणाऱ्या किमतीत घर मिळवण्याची मोठी संधी मानली जाते. आता लॉटरीची अधिकृत घोषणा, अर्ज प्रक्रिया, घरांच्या किमती आणि आरक्षणाची माहिती कधी जाहीर होते, याकडे घर खरेदी करू इच्छिणाऱ्या नागरिकांचे लक्ष लागले आहे. (MHADA Lottery 2026)

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने