Chandrashekhar Bawankule : ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने’साठी ९१ विधानसभा मतदारसंघांत 'सह अध्यक्षां'ची नेमणूक; महसूलमंत्री बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याच्या असलेल्या ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या कामात अधिक सुसूत्रता आणण्यासाठी ९१ विधानसभा क्षेत्र स्तरीय समित्यांमध्ये 'सह अध्यक्ष' पदाची अधिकृत नेमणूक करण्यात आली असून, याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे.



राज्यातील शेत व पाणंद रस्त्यांची कामे सुलभ पद्धतीने आणि जलद गतीने व्हावीत यासाठी १४ डिसेंबर २०२५ रोजी या योजनेची सुरुवात करण्यात आली होती. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी गठित करण्यात आलेल्या विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीच्या कामकाजात मदतीसाठी एका 'सह अध्यक्षा'ची निवड करण्याचे अधिकार महसूल मंत्री यांना देण्यात आले होते. त्यानुसार शासनाच्या विचाराधीन असलेल्या बाबीवर शिक्कामोर्तब करण्यात आले असून ९१ विधानसभा मतदारसंघांमधील लोकप्रतिनिधी व मान्यवरांची सह अध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली आहे. सर्व नवनियुक्त सह अध्यक्षांचा समित्यांमध्ये समावेश करून पुढील आवश्यक ती कायदेशीर कारवाई तातडीने करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

Comments
Add Comment

Jaykumar Rawal : अत्याधुनिक सुविधा आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत मुंबई विमानतळाजवळ ‘नंदगिरी राज्य अतिथीगृह’ उभारणार; मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

मुंबई : विविध राज्यांतून मुंबईत येणाऱ्या मान्यवर अतिथींच्या निवासासोबतच ट्रान्झिट प्रवासादरम्यान

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Mumbai Trees Damaged by Cables : टेलिकॉम कंपन्यांच्या केबल्सचा झाडांना विळखा

तातडीने उपाययोजना राबवून कारवाई करण्याची वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मागणी मुंबई : मुंबईत सध्या इंटरनेट,

Devendra Fadnavis : सुट्या खाद्य तेलाच्या विक्रीस वर्षभराची मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

पारंपरिक व्यावसायिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी समिती स्थापन करणार मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Ashish Shelar : दहिसर 'ट्रान्सपोर्ट हब'च्या कामादरम्यान 'ब्लास्टिंग' नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करा!

- पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश; बाधित इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, खनिज वाहतुकीची चौकशी करावी मुंबई : दहिसर