Kudankulam Nuclear Project : कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाची गोपनीय माहिती डार्क वेबवर

आराखडे, पुरवठादार आणि संवेदनशील कागदपत्रांसह १९ हजार फाईल्स उघड


नवी दिल्ली : तमिळनाडू येथील कुडनकुलम भारताच्या सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाशी संबंधित गोपनीय माहिती चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रॅन्समवेअर ‘वर्ल्ड लीक्स’ने अणुऊर्जा प्रकल्पाशी संबंधित गोपनीय माहितीच्या फाईल्स डार्क वेबवर प्रसिद्ध केल्या आहेत. या फाईल्समध्ये प्रकल्पाचे आराखडे आणि पुरवठादार यांचा तपशील असल्याचे वृत्त रॉयटर्सने प्रसिद्ध केले आहे. या प्रकल्पाचे काम रिलायन्स ग्रुपकडे असून, त्यांच्याकडूनच हा डेटा मिळाल्याचा दावा ‘वर्ल्ड लीक्स’ने केला आहे.(New Delhi)



तमिळनाडू येथील कुडनकुलम येथे असणारा हा प्रकल्प देशात होऊ घातलेल्या सात अणुऊर्जा प्रकल्पांपैकी सर्वात मोठा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांचा हा एक महत्वकांक्षी प्रकल्प मानला जातो. या अणुऊर्जा प्रकल्पाचे काम रिलायन्स ग्रुप असून, या गोपनीय माहितीच्या चोरीप्रकरणी रिलायन्सने स्पष्टीकरण दिले आहे. ‘योट्टावर होस्ट केलेल्या सर्व्हरवरील डेटामध्ये छेडछाड झाली आहे. या घटनेची माहिती सरकारला देण्यात आली आहे’, असे स्पष्टीकरण रिलायन्सकडून रॉयटर्सला देण्यात आले आहे. दरम्यान, रिलायन्सकडून नेमका कोणता डेटा चोरीला गेला आहे, हे स्पष्ट केलेले नाही. योट्टा भारतात डेटा सेंटरची सेवा पुरवणारी संस्था आहे.



‘डेटा चोरीला गेल्याने अणुऊर्जा प्रकल्पाच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो’, अशी भीती न्यूक्लियर थ्रेट इनिशिएटिव्हचे वरिष्ठ संचालक निकोलस रॉथ यांनी रॉयटर्सशी बोलताना व्यक्त केली आहे. या सायबर हल्ल्यामुळे भारतात हॅकिंगच्या घटना वाढत असल्याचे दिसून येते आहे, अशी चिंता रॉथ यांनी व्यक्त केली. प्रकल्पाच्या उघड झालेल्या माहितीची पडताळणी रॉयटर्सने केल्याचे वृत्तात म्हटले आहे. या वृत्तानुसार, समोर आलेल्या कागदपत्रांमध्ये २०१६ ते २०२५ दरम्यानची प्रकल्पांचे आराखडे, पुरवठादारांचे तपशील, बैठका, प्रकल्पाचा पडताळणी तपशील, उपकरणांची पडताळणी आणि विमा पॉलिसी यांची माहिती असल्याचे समोर आले आहे.



रॉयटर्सच्या वृत्तानुसार, रॅन्समवेअर वर्ल्ड लीक्सने रिलायन्सच्या एकूण ८ लाख ५८ हजार फाईल्स डार्क बेववर प्रसिद्ध केल्या असून, त्यापैकी १९ हजार फाईल्स अतिशय संवेदनशील आहेत. रिलायन्स समूहातीलच रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला २०१८ मध्ये या प्रकल्पाच्या युनिट ३ आणि युनिट ४ च्या डिझाइन आणि बांधकामाचे कंत्राट मिळाले होते. ही दोन्ही युनिट्स २०२७ पर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. यातून २,००० मेगावॅट विजेची क्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. वर्ल्ड लीक्सने यापूर्वी नाईकी आणि टाटा ग्रुपवर देखील सायबर हल्ला केला होता. सध्या या हल्ल्याबाबत मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याचे रॉयटर्सच्या वृत्तात म्हटले आहे.

Comments
Add Comment

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि

Dr. Koyyala Ruth John Paul: संघर्षातून यशाकडे! भारतातील तृतीयपंथीयांचा वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास

मुंबई: तृतीयपंथातील अनेक व्यक्तींना आजही सामाजिक भेदभाव, शिक्षणातील अडचणी, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि