Cooper Hospital : कूपरच्या प्रसाधनगृहात अर्भकाचा मृतदेह, BMC ने दिली मोठी अपडेट

‘मुंबई Mumbai :  कूपरच्या प्रसाधनगृहात अर्भकाचा मृतदेह’ या विषयाच्या अनुषंगाने विविध प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या प्रसारित झाल्या आहेत. याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे पुढीलप्रमाणे स्पष्टीकरण करण्यात येत आहे.(Brihanmumbai Municipal Corporation)



डॉ. रुस्तम नरसी कूपर रुग्णालयात दिनांक १३ जुलै २०२६ रोजी सकाळी तळ मजल्यावरील महिला अपघात विभागातील स्वच्छतागृहात एका महिलेला बेवारस अर्भक निदर्शनास आले. संबंधित महिलेने याबाबतची माहिती कर्तव्यावरील कर्मचाऱयाला दिली. रुग्णालयाच्या कार्यपध्दतीनूसार (Medicolegal) बेवारस स्थितीत आढळलेल्या अर्भकाची वैद्यकीय अधिकाऱयांकडून तत्काळ तपासणी करण्यात आली. तपासणीअंती अर्भकाला मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृत अर्भक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.



या घटनेबाबत रुग्णालय प्रशासनाकडून लेखी तक्रार ही जुहू पोलिस ठाणे येथे नोंदविण्यात आली आहे. स्थानिक पोलीस ठाण्यामार्फत या प्रकरणात अधिक तपास सुरु आहे.(Juhu Police Station)

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म