LOCK UPP 2 : थेट शिवांगी जोशीच्या 'व्हर्जिनिटी'वरच बोट; LOCK UPP 2 मध्ये नेमकं चाललंय तरी काय?

 Lock Upp 2 :'लॉक अप २'मध्ये अभिनेत्री शिल्पा शिंदेच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. शोदरम्यान शिल्पा शिंदे आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर श्रेया कालरा यांनी अभिनेत्री शिवांगी जोशी आणि अभिनेता हर्षद चोप्रा यांच्याविषयी बोलताना केलेल्या टिप्पणीवर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ( Shilpa Shinde)


शोमध्ये शिवांगी जोशी आणि हर्षद चोप्रा एकमेकांशी संवाद साधत असताना, शिल्पा आणि श्रेया यांनी त्यांची नक्कल करत विनोदी शैलीत काही संवाद सादर केले. या वेळी शिल्पाने शिवांगीच्या वैयक्तिक आयुष्याचा आणि तिच्या व्हर्जिनिटीचा संदर्भ देणारी टिप्पणी केली. त्यानंतर श्रेया कालरानेही हर्षदची नक्कल करत या संवादात सहभाग घेतला. ( Lock Upp 2)



या प्रसंगादरम्यान शिवांगी जोशीने कोणतीही प्रतिक्रिया न देता शांत राहणे पसंत केले. (Shivangi Joshi)


दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी शिल्पा शिंदेच्या वक्तव्यावर टीका केली आहे. अनेकांनी एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यावर किंवा चारित्र्यावर सार्वजनिकपणे टिप्पणी करणे अयोग्य असल्याचे मत व्यक्त केले आहे.



ही पहिलीच वेळ नसल्याचेही प्रेक्षकांचे म्हणणे आहे. यापूर्वीही शोमध्ये शिल्पा शिंदेने शिवांगी जोशीला हर्षद चोप्रासोबत कमी बोलण्याचा सल्ला दिल्याने तिच्या वर्तनावर चर्चा झाली होती. आता नव्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा हा वाद चर्चेत आला असून, यावर संबंधित कलाकारांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. (Entertainment News)

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’