Tree Protection Rules : यापुढे रस्ते कामांसह इतर प्रकल्पांच्या खोदकाता झाडांभोवती जेसीबी,पोकलेन वापरण्यास बंदी

 Mumbai: मुंबईतील कुठल्याही उपयुक्तता संस्थासाठी मग रस्ते असेल वा पर्जन्य जलवाहिनी, मलवाहिनींसह इतर कामांसाठी खोदकाम करायचे असेल तर मुळाच्या आजूबाजूला काम करत असताना कुठल्याही परिस्थितीत जेसीबी अथवा पोकलेन सारखे मोठे संयंत्र वापरण्यावर पूर्णपणे मनाई करावे व ते काम मनुष्यबळामार्फत करावे. कुठल्याही परिस्थितीत झाडाच्या मुळांना इजा पोहोचणार नाही याची परिपूर्ण खबरदारी घेण्यात यावी व याची संपूर्ण जबाबदारी प्रकल्प राबवणाऱ्या संस्थेवर दयावी. तसेच खोदकाम झाल्यानंतर मुळा सभोवतालची जागा ही उद्यान विभागाने प्रमाणित केलेल्या लाल मातीने भरून रूट बेसिन अबाधित राहील याची काळजी घ्यावी. शहरी झाडांची पाहणी, देखभाल, छाटणी आणि सहामाही सुरक्षा लेखापरीक्षणासाठी एक 'प्रमाणित कार्यपद्धती' (SOP) विकसित करून ती लागू करावी. या पाहणी अहवालांचे पुनरावलोकन आणि प्रमाणीकरण संबंधित विभाग प्रमुखांनी एका स्वतंत्र वृक्ष तज्ज्ञासोबत एकत्र येऊन करावे.



शहरी रस्त्यांच्या कडेला, जेथील जागा व परिस्थिती योग्य / अनुरुप असेल तिथे, पूर्ण वाढ झाल्यावर साधारणपणे १५-२० फूट उंची गाठणाऱ्या योग्य स्थानिक वृक्ष प्रजातींच्या लागवडीला प्रोत्साहन द्यावे; ज्यामुळे पर्यावरणीय फायदे टिकून राहतील आणि भविष्यात पायाभूत सुविधांशी होणारा अडथळा कमी होईल. शैक्षणिक मोहिमांद्वारे सार्वजनिक जनजागृती बळकट करावी आणि शहरी वृक्ष व्यवस्थापनात कार्यरत असलेल्या प्रमाणित कंत्राटदारांना, पर्यवेक्षकांना आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना नियमित प्रात्यक्षिक प्रशिक्षण द्यावे. गुणवत्ता नियंत्रण आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी विशिष्ट वृक्षसंवर्धन कामांचे उपकंत्राट देणे कमीत कमी करावे. झाडांच्या मुळांची व्याप्ती ही झाडांच्या वरील डोलाऱ्याच्या योग्य प्रमाणात असावी. ज्यामुळे झाडाच्या डोला-याला व्यवस्थित आधार मिळू शकेल व झाड पडणार नाही. उद्यान विभागात अस्तित्वात असलेल्या कर्तव्य सूचीमध्ये कर्तव्य नमूद केलेले आहे. सदर कर्तव्य सूचीमध्ये प्रत्येक झाडाला न्याय देण्यासाठी त्याचे निरीक्षण व पुढील काळजी घेण्यासाठी योग्य वेळ उपलब्ध होऊ शकत नाही असे उद्यान विभागाच्या निवेदनामध्ये सादर केलेले आहे. यावर उपाययोजना म्हणून मुख्य अभियंता (विकास नियोजन) यासारख्या इतर विभागांच्या धरतीवर व्यवसाय सुलभतेसाठी उद्यान विभागामार्फत नोंदणीकृत अनुज्ञाप्ती झाड तज्ज्ञ नियुक्ती करावी, असे प्रस्तावित करण्यात येत आहे. यासाठी महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने निश्चित केलेली आवश्यक अर्हता विचारात घ्यावी, जेणेकरून त्यांच्यामार्फत झाडांची निगा/सुरक्षा राखण्याचा मुख्य उद्देश साध्य होईल.(Mumbai News)



रस्ते व इतर प्रकल्प विभागाच्या तसेच उद्यान विभागाच्या कर्तव्य सूचीमध्ये प्रकल्प व उदयान विभाग यांच्या संयुक्त पाहणीचा समावेश करणे. इथून पुढे येणाऱ्या पावसाळ्यानंतरच्या ऑक्टोबर २०२६ पासून चालू होणाऱ्या सर्व कामांमध्ये झाडाची मुळे अबाधित राहून झाडांच्या मुळांना कोणताही धोका /इजा पोहोचणार नाही या दृष्टीने प्रकल्प संस्थातर्फे परिपूर्ण काळजी घेण्यात यावी असे परिपत्रक उदयान विभागामार्फत प्रसारीत करण्यात यावे. आर्द्र हवामानामुळे झाडांना बुरशी लागण्याची संभावना असते त्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जसे कीटकनाशक वापरले जाते तसे बुरशी प्रतिबंधक उपाययोजना कार्यान्वित व्हावी. रस्त्यालगतच्या वृक्षारोपणासाठी उद्यान विभागाने योग्य ते धोरण सक्षम प्राधिकारी यांच्या मान्यतेने निश्चित करावे. उद्यान विभागाच्या कर्तव्य सूचीमध्ये खासगी सोसायटीमधील झाडांचा समावेश आहे, परंतु यामध्ये अगोदरच महानगरपालिकेच्या हद्दीतील उदयान कार्यभार कर्मचाऱ्यांवर जास्त असल्याने खासगी सोसायटीमधील झाडांबाबतचे ऑडीट संबंधित सोसायटीने पॅनेल केलेल्या वृक्ष तज्ञांकडून घेण्याबाबत धोरण ठरवावे.



कडक उन्हाळयाच्यावेळी झाडांना पुरेसे पाणी उपलब्ध न झाल्याने झाडांवर ताण येऊन झाडांची मुळे कमकुवत होण्याची संभावना असल्याकारणाने, जशी झाडाचा डोलारा कमी करण्यासाठी झाडांची त्रिकोणामीतीत छाटणी करण्याची यंत्रणा असते तशीच शक्य असल्यास, उन्हाळयाच्या दिवसात झाडांच्या मुळांशी खत/पाण्याचा पुरवठा करणाऱ्या एखादया यंत्रणेची अंमलबजावणी करण्यात यावी. उद्यान विभागाने मुंबईतील सोसायटींच्या बाहेरील बाजूस रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांबाबत संबंधित सोसायटीतील वृक्षप्रेमींना 'वृक्षमित्र संकल्पना' याबाबत जनजागृती करावी. ज्यामध्ये सदर झाडांची काळजी घेणे, त्यांची जोपासना करणे इ. बाबींचा समावेश करुन वृक्षसंवर्धन करावे. अशा वृक्षप्रेमींचा सत्कार करुन सदर बाबीस प्रसार माध्यमांमध्ये प्रसिध्दी देण्यात यावी. जेणेकरुन सदर 'वृक्षमित्र संकल्पनेस' प्रोत्साहन मिळेल. सदर संकल्पनेदरम्यान वृक्षप्रेमी /स्थानिक रहिवाशी यांना एखादे झाड सुस्थितीत नसल्याबाबत शंका उपस्थित झाल्यास त्यांना सदर बाब तात्काळ उद्यान विभागाला कळविण्याबाबत एखादे अॅप/यंत्रणा उद्यान विभागाने विकसित करावी. महानगरपालिका आयुक्त यांच्या दिनांक ३ जुलै २०२६ रोजीच्या परिपत्रकामधील 'पायाभूत सुविधांची पुर्नबांधणी करतेवेळी अस्तित्वातील झाडांची निगा राखण्याबाबत' पारित केलेल्या सर्व आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे. महाराष्ट्र (शहरी क्षेत्र) वृक्ष संवर्धन आणि संरक्षण अधिनियम १९७५ तसेच महाराष्ट्र शासन व बृहन्मुंबई महानगरपालिका, उद्यान विभाग यांनी वृक्ष संवर्धन संबंधात वेळोवेळी प्रसारीत केलेली परिपत्रके /मार्गदर्शक तत्वे यांचे अनुपालन व्हावे.



झाडांची नियमित पाहणी, जोखीम मूल्यांकन, छाटणी, देखभाल व आपत्कालीन प्रतिसाद यासंदर्भातील मार्गदर्शक तत्वे व कार्यपध्दतीबाबत शिफारसी. भविष्यात अशा प्रकारच्या घटनांची शक्यता कमी करण्यासाठी अहवालात सुचविलेल्या उपाययोजनांव्यतिरिक्त झाडांची नियमित पाहणी, जोखीम मूल्यांकन, छाटणी, देखभाल व आपत्कालीन प्रतिसाद यासंदर्भातील मार्गदर्शक तत्वे व कार्यपध्दतीबाबत खालीलप्रमाणे शिफारसी करण्यात येत आहेत. चेंबूर (पश्चिम) येथील डायमंड गार्डनजवळ दिनांक ३० जून २०२६ रोजी शाळेच्या बसवर पिंपळ प्रजातीचा वृक्ष मुळासकट उन्मळून पडून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी चौकशी समितीच्या अहवालातील निष्कर्ष आणि शिफारशींवर प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले आहेत.

Comments
Add Comment

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा