Mumbai Crime Branch : मुंबईत बनावट दुधाचा मोठा भांडाफोड; ५७५ लिटर भेसळयुक्त दूध जप्त

गोरेगाव पोलीस ठाण्याची मोठी कारवाई, दोघांना अटक


मुंबई : मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ११ ने गोरेगाव (Goregaon) पश्चिम येथे भेसळयुक्त दूध तयार करून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे ५७५ लिटर भेसळयुक्त दूध, दूध पॅकिंगसाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त मालाची एकूण किंमत ७०,४०४ रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Mumbai)



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव पश्चिम येथील प्रेमनगर, लिंक रोडवरील अंकुर बिल्डिंगमध्ये आरोपी नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या पिशव्यांमधील शुद्ध दूध काढून त्यात पाणी मिसळत होते. त्यानंतर त्या पिशव्या पुन्हा सील करून हे भेसळयुक्त दूध ग्राहकांना विकले जात होते. (Goregaon)


या प्रकाराची गुप्त माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखा, कांदिवलीला मिळाल्यानंतर १५ जुलै २०२६ रोजी सकाळी अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) अधिकाऱ्यांसह संयुक्त छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान आरोपी प्रत्यक्ष दूधाच्या पिशव्या उघडून त्यात पाणी मिसळत आणि पुन्हा सील करताना रंगेहाथ पकडले गेले. (Mumbai Police)







या कारवाईत ५७५ लिटर भेसळयुक्त दूध (Fake Milk), २२४ रिकाम्या दुधाच्या पिशव्या, दूध पॅकिंग व सीलिंगसाठी वापरले जाणारे साहित्य आणि एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS), अत्यावश्यक वस्तू अधिनियम आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी सांगितले की, भेसळयुक्त दूध नागरिकांच्या आरोग्यासाठी गंभीर धोका ठरू शकते. हा अवैध व्यवसाय किती दिवसांपासून सुरू होता आणि हे दूध मुंबईतील कोणकोणत्या भागात पुरवले जात होते, याचा पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

वैद्यकीय तज्ज्ञांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिले आरोग्याचे धडे, ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमाला तरूण- तरूणींचा उत्सफुर्त प्रतिसाद

मुंबई: बदलती जीवनशैली, मोबाईलचा वाढता वापर, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी आणि मानसिक ताण या वेगवेगळ्या

मुंबईत दीड वर्षांच्या मुलीला सहाव्या मजल्यावरून ढकललं, आरोपीच्या आईनं पुरावे नष्ट करण्यासाठी वापरली शक्कल

मुंबई: मुंबईतल्या गोरेगाव पूर्वेतील दिंडोशी परिसरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोरेगाव पूर्वेतील

abvp protest mumbai university : ‘बांगलादेशसारख्या अराजकतेला भारतात थारा नको!’; संविधानाच्या रक्षणासाठी मुंबई विद्यापीठात अभाविपतर्फे भव्य स्वाक्षरी अभियान व निदर्शने

मुंबई : देशातील लोकशाही व्यवस्था मजबूत राखणे, भारतीय संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करणे आणि राष्ट्रीय एकात्मता

Virar News: विरारमध्ये ज्युनिअर आर्टिस्टची आत्महत्या, अश्लील व्हिडिओंच्या आधारे कोट्यवधींची खंडणी उकळल्याचा आरोप

विरार: अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी उकळल्याच्या प्रकाराला कंटाळून

Versova Beach Dead Body : वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर गोणीत सापडला मृतदेह; 6 आरोपींना अटक

मुंबई : मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर 1 ऑक्टोबर रोजी गोणीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले