Mumbai Coastal Road Car Fire : मुंबई कोस्टल रोडच्या बोगद्यात भीषण अग्नितांडव! धावत्या कारने घेतला पेट, जीव वाचवण्यासाठी प्रवाशांची धावपळ

मुंबई : मुंबईकरांचा प्रवास वेगवान करणाऱ्या मुंबई कोस्टल रोडच्या बोगद्यात धक्कादायक घटना घडली आहे. बोगद्यातून धावत असलेल्या एका कारला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण बोगदा काळ्या धुराने भरून गेला. या घटनेमुळे कोस्टल रोडवरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. (Mumbai Coastal Road Car Fire)



बंदिस्त बोगद्यात धुराचे साम्राज्य; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण :


मिळालेल्या माहितीनुसार, कोस्टल रोडच्या बोगद्यात एक कार अचानक पेटली. बोगदा बंदिस्त असल्याने आगीचा धूर वेगाने पसरला. त्यामुळे वाहनचालकांना पुढील रस्ता दिसेनासा झाला, तसेच काहींना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे बोगद्यात प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. अनेकांनी खबरदारी म्हणून आपली वाहने बोगद्यातच सोडली आणि पायी चालत बोगद्याबाहेर जाण्यास सुरुवात केली. (Mumbai Coastal Road Car Fire)



प्रवाशांची जीव वाचवण्यासाठी धावपळ :


आगीचा धूर वाढत असल्याचे लक्षात येताच काही वाहनचालकांनी तातडीने गाड्या थांबवल्या. परिस्थिती गंभीर होत असल्याने नागरिकांनी मागच्या दिशेने धाव घेत सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न केला. या घटनेचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून बोगद्यातील धुराचे दृश्य पाहायला मिळत आहे. (Mumbai Coastal Road Car Fire)



नरिमन पॉईंटकडून येणारी वाहतूक बंद :


या दुर्घटनेनंतर कोस्टल रोडवरील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. नरिमन पॉईंटकडून येणारी वाहतूक बंद करण्यात आली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले. (Mumbai Coastal Road Car Fire)



सुदैवाने जीवितहानी नाही :


प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, कोस्टल रोडसारख्या अत्याधुनिक प्रकल्पातील आपत्कालीन सुरक्षा व्यवस्था, आग प्रतिबंधक उपाय आणि बचाव यंत्रणेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून घटनेचा तपास सुरू असून आग नेमकी कशामुळे लागली, याचा शोध घेतला जात आहे. (Mumbai Coastal Road Car Fire)






 
Comments
Add Comment

BMC Health Policy : शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य योजनांचा लाभ, नागरी आरोग्य धोरणाचा मसुदा सार्वजनिक आरोग्य समितीसमोर सादर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) BMC Health Policy : निरोगी मुंबई आणि भविष्यकालीन सज्जतेसाठी मुंबई महानगरपालिकेने नागरी आरोग्य

BMC Water Pipeline Leakage : पाणी गळती दुरुस्तीच्या कामांसाठी घाटकोपरला २७ कोटींचा ‘बूस्टर’!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर भागातील जलवाहिनीतून होणारी पाण्याची गळती रोखण्यासाठी महापालिकेच्या जल

Kandivali : स्वामी विवेकानंद मार्ग जंक्शन बस अपघातातील जखमी युवकावर कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात उपचारास नकार!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मालाड – मार्वे रोड, स्वामी विवेकानंद मार्ग जंक्शन येथे झालेल्या भीषण बस अपघातात २१

Kandivali : कांदिवलीतील डॉ.बाबासाहेब रुग्णालयातील साहित्य खरेदीत गैरव्यवहार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या कांदिवलीतील (Kandivali) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापालिका

BMC : घाटकोपर, मानखुर्द चेंबूर परिसरातील ०६ अनधिकृत लॉजवर जप्तीची कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) अनधिकृत व्यवसाय आणि नियमबाह्य बांधकामांविरोधात महानगरपालिकेकडून कारवाई सुरू आहे. या

मुंबईत ५१ दिवसांमध्ये १६,१५३ बॅनरांची फाडाफाडी

मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्या बॅनरबाजांवर महापालिकेच्यावतीने कारवाई केली जात असून