Ahilyanagar : अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, आरोपीला अटक; दोन गावे कडकडीत बंद

Ahilyanagar ( राहुरी /आश्वी प्रतिनिधी ) : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी (Rahuri) तालुक्यात तुळापूर (Tulapur) येथील एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनीचा रस्त्यात अडवून विनयभंग करण्यात आल्याची घटना बुधवारी संध्याकाळी घडली. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली असून, याच्या निषेधार्थ तुळापूर (Tulapur) आणि निंभेरे (Nimbhere) या दोन गावांनी कडकडीत बंद पाळण्यात आला. (Ahilyanagar Crime News)



नेमकं काय घडलं ?


मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पीडित अल्पवयीन विद्यार्थिनी बुधवारी संध्याकाळी आपल्या कामावरून जात असताना, आरोपी आरमान जब्बार शेख (Armaan Jabbar Sheikh) याने तिला रस्त्यात अडवले आणि तिचा विनयभंग केला. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे विद्यार्थिनी प्रचंड घाबरली होती. तिने तातडीने घरी जाऊन पालकांना हा सर्व प्रकार सांगितला. घटनेचे गांभीर्य ओळखून पालकांनी तात्काळ राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली.ही घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले. आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळाला. (Ahilyanagar Crime News)



संतप्त ग्रामस्थांचा पोलिसांसमोर ठिय्या


संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला आपल्या ताब्यात देण्याची मागणी करत पोलिसांच्या गाडीसमोर ठिय्या मांडला. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांनी जमावाला शांत करत कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिले.पालकांच्या तक्रारीवरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी आरमान जब्बार शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेचा तपास चक्रावून फिरवत आरोपी आरमान शेख याला ताब्यात घेतले आहे. (Ahilyanagar Crime News)



दोन गावे कडकडीत बंद


या घटनेचा निषेध म्हणून गुरुवारी सकाळी तुळापूर आणि निंभेरे गावातील ग्रामस्थांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला. यावेळी आयोजित निषेध सभेत नागरिकांनी महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याची भावना व्यक्त केली. महिलांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने कडक पावले उचलावीत, अशी मागणी या निमित्ताने जोर धरत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी आरोपीला अटक केल्याने ग्रामस्थांनी काहीसा दिलासा व्यक्त केला आहे. घटनेची माहिती सरपंच गणेश हारदेव, माजी सभापती भीमराज हारदे यांनी भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांना व राहुरी मतदार संघाचे आ.अक्षय कर्डिले, आ.प्राजक्त तनपुरे यांना दिली व त्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला.

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''