Sispe-Infinite Scam : 114.93 कोटींच्या मालमत्तेवर शासनाची जप्ती; ठेवीदारांना मोठा दिलासा

Sispe-Infinite Scam : अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुचर्चित सिस्पे, इनफिनाईट बिकन आणि तत्सम कंपन्यांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसानी ११४ कोटी ९३ रुपयांचा एमपीआयडी प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. त्यास शासनाने मंजुरी दिली असून, नगर-पारनेर उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे ठेवेदारांना दिलासा मिळाला असून, पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.



114.93 कोटींच्या मालमत्तेवर शासनाची जप्ती


अहिल्यानगर जिल्ह्यातील सिस्पे, इनफिनाईट बिकन आणि तत्सम कंपन्यांचा आर्थिक घोटाळा हा ११४ कोटी ९३ रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे जिल्ह्यात या प्रकाराची चर्चा जोरात सुरु आहे. आर्थिक गुन्हे शाखेने या गुन्ह्यात केलेल्या तपासात कंपनी, तिचे संचालक, एजंट आणि संबंधितांच्या नावावरील मालमत्तेचा शोध घेतला. त्यामध्ये ११३ कोटी ३८ लाख रूपयांची बँक व डिमॅट खात्यांतील रक्कम तसेच एक कोटी ५५ लाख रूपयांची स्थावर मालमत्ता आढळून आली. या सर्वांचा समावेश असलेला ११४ कोटी ९३ लाख रूपयांचा एमपीआयडी प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. शासनाने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर संबंधित मालमत्तांवर जप्तीची प्रक्रिया लागू झाली आहे. या मालमत्तेचे व्यवस्थापन आणि पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी श्रीगोंदा-पारनेर विभागाचे उपविभागीय दंडाधिकारी (प्रांत अधिकारी) यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या देखरेखीखाली जप्त केलेल्या रोख रकमेबाबत व स्थावर मालमत्तेबाबत पुढील प्रक्रिया पार पडणार आहे.



एमपीआयडीच्या प्रस्तावास शासनाने मंजुरी


सिस्पे सिस्पे, इनफिनाईट बिकन अशा कंपन्याच्या घोटाळ्यात आतापर्यंत कोट्यवधींची रोख रक्कम व मालमत्ता निष्पन्न झाली आहे. त्यातील ११४ कोटी ९६ लाखांच्या एमपीआयडीच्या प्रस्तावास शासनाने मंजुरी दिली असून, प्राधिकृत अधिकऱ्यांची नियुक्ती केली आहे. आता जास्ती जास्त गुंतवणूकदारांनी जबाब देण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेत यावे असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे (Dr. Sharad Gorde) यांनी केले आहे,


श्रीगोंदा, सुपा आणि तोफखाना पोलीस ठाण्यांत (Topkhana Police Station) सिस्पे, इनफिनाईट व तत्सम कंपन्यांविरोधात चार गुन्हे दाखल असून त्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. तपासाच्या सुरूवातीला श्रीगोंदा पोलीस ठाण्यात (Shrigonda Police Station) गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये एमपीआयडी कायद्याची कलमे लागू करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन (Mummaka Sudarshan) व पोलीस उपअधीक्षक गणेश उगले (Ganesh Ugale) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांचे पथक करत आहेत.

Comments
Add Comment

Hindi Exam : सरकारी कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा शिकण्याची सक्ती करणारा निर्णय रद्द

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयामार्फत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात येणारी ‘हिंदी भाषा

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेत सप्टेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यव्यापी शिबीर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय राज्यव्यापी शिबिर २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आल्याची

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली