Mumbai Local Train Crime : लोकलमधील किरकोळ वादाचं भीषण रूप; मध्यरात्री घडली धक्कादायक घटना

मुंबई : मुंबईच्या (Mumbai) लोकल ट्रेनमध्ये (Local Train) पुन्हा एकदा धक्कादायक गुन्ह्याची (Crime) घटना समोर आली आहे. मध्यरात्री मुंबईहून अंबरनाथकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये सीटवरून (Seat) झालेल्या किरकोळ वादाचे (Dispute) रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात (Attack) झाले. तीन जणांनी एका प्रवाशावर धारदार कोयत्याने सपासप वार करत गंभीर जखमी केले. ही घटना ठाकुर्ली (Thakurli) रेल्वे स्थानकावर (Railway Station) घडली.


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून अंबरनाथच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये मध्यरात्री दोन प्रवाशांमध्ये बसण्याच्या जागेवरून वाद सुरू झाला. सुरुवातीला केवळ शाब्दिक बाचाबाची झाली; मात्र ट्रेन पुढे जात असताना हा वाद अधिकच चिघळत गेला.



रात्री सुमारे १२:१० वाजता ट्रेन ठाकुर्ली स्थानकावर थांबताच तिघांनी अचानक धारदार कोयता बाहेर काढत संबंधित प्रवाशावर सपासप वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे डब्यात एकच गोंधळ उडाला. इतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.


हल्ल्यानंतर आरोपी (Accused) तातडीने ट्रेनमधून उतरले आणि अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून फरार (Absconding) झाले. गंभीर जखमी झालेला प्रवासी रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. घटनेची माहिती मिळताच कल्याण रेल्वे पोलिसांनी (Railway Police) तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला उपचारासाठी (Treatment) कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.


या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल केला असून फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे. स्थानक आणि परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजच्या (Footage) आधारे तपास (Investigation) सुरू असून आरोपींना लवकरच अटक (Arrest) करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Comments
Add Comment

IND vs WI: वेस्ट इंडिजसमोर भारताचा 'अभेद्य किल्ला'! 7 वर्षांचे वर्चस्व राखण्याचे टीम इंडियासमोर आव्हान

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचा निर्णय शेवटच्या सामन्यावर येऊन ठेपला आहे. 17

Yo Yo Honey Singh : 'यो यो हनी सिंग'च्या अडचणीत मोठी वाढ! आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलचा मोठा दणका

प्रसिद्ध रॅपर आणि संगीतकार हिरदेश सिंग, ज्यांना जगभर 'यो यो हनी सिंग' (Yo Yo Honey Singh) या नावाने ओळखले जाते, त्यांच्यामागील

Prime Video Chaar Yaar : प्राइम व्हिडिओच्या ‘चार यार’चा ट्रेलर प्रदर्शित; २००० च्या दशकातील मुंबईत उलगडणार गुन्हेगारी आणि मैत्रीची अनोखी कहाणी!

एक्सक्लुझिव्ह ओरिजिनल्ससाठी ओळखली जाणारी भारतातील आघाडीची स्ट्रीमिंग सेवा प्राइम व्हिडिओने आज आपल्या आगामी

Versova Beach Dead Body : वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर गोणीत सापडला मृतदेह; 6 आरोपींना अटक

मुंबई : मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर 1 ऑक्टोबर रोजी गोणीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

पुरूष क्रिकेटपटूंनाही जे जमलं नाही, ते स्मृती मंधाना करणार! फक्त 133 धावा करताच रचणार ऐतिहासिक महाविक्रम

[caption id="attachment_1066855" align="aligncenter" width="800"] भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात 16 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या

Nashik News : सरकारी कार्यालयातच महिला अधिकाऱ्याने संपवलं जीवन , नाशिकमध्ये खळबळ

Malegaon News : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मालेगाव शहरातील सहकार निबंधक कार्यालयातील