Nashik Crime News : ७० लाखांना लुटणाऱ्या टोळीची 'ईनसाइड स्टोरी'; ब्युटी पार्लर ते...

Nashik Crime News : नाशिकमधील एका प्रकरणाशी संबंधित आरोपींना पकडण्यामागची कहाणी आणि आरोपींनी कसा कट रचला याची स्टोरी चित्रपटाला शोभावी अशी आहे. व्यावसायिकाला ७० लाखांना लुटणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात पोलिसांना यश आलं आहे. विशेष म्हणजे ही टोळी स्वतःला पोलीस, आयकर किंवा रेल्वेचे अधिकारी सांगून समोरच्या व्यक्तींची लूट करत होती.


नाशिकच्या दिंडोरी रोड परिसरात (Dindori Road Area) भरदिवसा पोलीस (Police) असल्याची बतावणी करून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत ७० लाखांची रोकड या टोळीने लुटली होती. या आंतरराज्यीय टोळीचा गुन्हेशाखा युनिट क्रमांक १ ने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका महिलेसह चार जणांना अटक करण्यात आली असून, संशयितांकडून ८२ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.



आंतरराज्यीय टोळी कशी अडकली ?


आंतरराज्यीय टोळीतील एका व्यक्तीचे एका ब्युटी पार्लर चालविणाऱ्या महिलेसाेबतचे प्रेमसंबंध आणि त्यातून उभा राहिलेला हा आंतरराज्यीय गुन्हेगारीचा डोलारा. या संपूर्ण गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार संशयित उमाशंकर वर्मा हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असला, तरी त्याचे नाशिकमधील कनेक्शन ओझर येथील एका ब्युटी पार्लरशी जुळले होते.



संशयिताकडे हुबेहूब सरकारी बनावट ओळखपत्रे


पार्लर चालवणारी संगीता आहिरे ही वर्माची प्रेयसी आहे. तिला दरमहिन्याला काही रक्कम खर्चायला देणे, रेल्वेचा बनावट व्हीआयपी पास बनवून देणे, यातून वर्माने नाशिकमध्ये स्थान मजबूत करण्यास सुरुवात केली. व्यावसायिकाला लुटण्यासाठीही वर्माने याच प्रेमसंबंधांचा एका ‘कव्हर’सारखा वापर केल्याचं तपासात समाेर आले आहे. वर्मा हा कोणा एका विभागाचा बनावट अधिकारी नाही तर, पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केलेल्या ओळखपत्रांमध्ये तो एकाच वेळी केंद्रीय गृह मंत्रालय, आयकर विभाग लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि रेल्वे मंत्रालयाचा बडा अधिकारी असल्याचे दाखवत होता. एकाच संशयिताकडे देशातील सर्वात प्रतिष्ठित चार सरकारी विभागांची हुबेहूब बनावट ओळखपत्रे सापडणे, हे या टोळीच्या आंतरराज्यीय फसवणुकीच्या मोठ्या नेटवर्ककडे बोट दाखवणारे आहे.



​‘अग्निशस्त्रां’चे गूढ फॉरेन्सिक लॅबमध्ये सुटणार


फक्त बनावट ओळखपत्रेच नाही तर संशयितांनी या गुन्ह्यात लष्कर किंवा निमलष्करी दलाकडे असणाऱ्या अत्यंत आधुनिक ‘एमपी-५’ रायफलसदृश शस्त्राचा आणि रिव्हॉल्व्हरचा देखील वापर केला. ही शस्त्रे केवळ लोकांना घाबरवण्यासाठी तयार केलेली हुबेहूब ‘डमी’ खेळणी आहेत की त्यातून गोळीबार करून एखाद्याचा जीव जाऊ शकतो, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जर ही अग्निशस्त्रे खरी निघाली, तर देशाच्या सुरक्षा यंत्रणांसाठीही हा तपासाचा एक मोठा आणि गंभीर विषय ठरणार आहे.



गुन्हेगारांच्याच स्टाईलने पोलिसांनी गेम उलटवला


​गुन्हेगार जसे वेशांतर करून फसवणूक करत होते, तसेच वेशांतर करून नाशिक पोलिसांनी त्यांना टिपले. आरोपी मुंबईच्या दिशेने पळाल्याचे समजताच गुन्हे शाखेच्या पथकाने थेट जोगेश्वरी, अंधेरी, डोंबिवली आणि वसई गाठली. पोलिसांच्या विविध पथकांनी तेथील स्थानिक गर्दीत चहाच्या टपऱ्यांवर, रेल्वे स्थानक परिसरात सामान्य नागरिक, फेरीवाले आणि प्रवाशांचे वेशांतर करून पाळत ठेवली आणि संशयितांना जाळ्यात ओढले. दरम्यान, अटक (Arrested) करण्यात आलेल्यांमध्ये उमाशंकर प्रेमशंकर वर्मा (४०, रा. आझमगड, उत्तर प्रदेश), सुजितकुमार राजकिशोर दुबे (३२,रा. धनबाद, झारखंड), निलेश अशोक पका (२७, रा. वसई) आणि संगीता हंसराज अहिरे (४३, रा. नाशिक, मूळ जळगाव) यांचा समावेश आहे. सध्या या अटकेची चर्चा शहरात रंगत आहे.

Comments
Add Comment

Mumbai Railway Megablock: प्रवाशांनो कृपया लक्ष असुद्या! रविवारी तीन मार्गिकेवर 'मेगा ब्लॉक'; जाणून घ्या सर्व अपडेट

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार दिनांक 18 ऑक्टोबर

BMC News : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पासाठी मोठी कारवाई! मुलुंडमध्ये आणखी २१५ बांधकामे हटवली

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडून उपनगरांतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या

संविधानाची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे ही काळाची गरज, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

मुंबई (विशेष प्रतिनिधी): भारतीय संविधान हे केवळ एक दस्तऐवज नसून त्यातील तत्वे प्रत्यक्ष जीवनात उतरविणे महत्चसचे

Saudi Arabia Flight Update : सौदी अरेबियासाठी विमानसेवा रद्द! IndiGo आणि Akasa Air चा मोठा निर्णय; प्रवाशांनी लक्ष द्या

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या तणाव आणि सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, इंडिगो आणि अकासा एअर या

Weather Alert: हवामानाचा मोठा इशारा! उद्या 16 राज्यांत पावसाचा रेड अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

देश: हवामान विभागाने पुन्हा एकदा 16 राज्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 17

Palm Jaggery Export : भारताच्या सेंद्रिय पामिरा गुळाची बल्गेरियाला पहिली निर्यात; 1.755 टनांची खेप रवाना

नवी दिल्ली : भारताच्या पारंपरिक आणि पौष्टिक अन्नपदार्थांनी आता जागतिक पातळीवर आपली पाळेमुळे घट्ट करण्यास