Rajasthan Teacher Suspended : संतापजनक कृत्य..! ५०० रुपये चोरीच्या संशयावरून विद्यार्थिनींना केलं विवस्त्र; VIDEO

सवाई माधोपूर : राजस्थानातील सवाई माधोपूर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. ५०० रुपये चोरी झाल्याच्या संशयावरून विद्यार्थिनींना जबरदस्तीने कपडे काढण्यास भाग पाडल्याचा आरोप एका वरिष्ठ महिला शिक्षिकेवर करण्यात आला आहे. या प्रकरणी शिक्षण विभागाने संबंधित शिक्षिकेला तात्काळ निलंबित केले असून विभागीय चौकशी सुरू केली आहे. ( Rajasthan News)



नेमकं काय आहे प्रकरण ?


ही घटना बामनवास परिसरातील लिवाली गावातील शासकीय वरिष्ठ माध्यमिक शाळेत घडली. शाळेत हिंदी विषयाच्या वरिष्ठ शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या सरस्वती मीना यांच्यावर हा आरोप करण्यात आला आहे. (School News)



मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षिकेच्या बॅगेतून ५०० रुपये गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी वर्गातल्या विद्यार्थिनींवर संशय व्यक्त केला. त्यानंतर नववी आणि अकरावीच्या विद्यार्थिनींना एका खोलीत नेऊन त्यांच्या झडतीच्या नावाखाली कपडे काढण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. आपले ५०० रुपये मुलींनीच चोरले असल्याचे त्यांना संशय होता.



पालकांचा संताप


या प्रकरणाची माहिती मुलींनी आपल्या पालकांना दिली. घटनेची माहिती मिळताच संतप्त पालकांनी शाळेत धाव घेत गोंधळ घातला. त्यानंतर शिक्षण विभाग आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. प्राथमिक चौकशी अहवालानंतर शिक्षण विभागाने संबंधित शिक्षिकेला तात्काळ प्रभावाने निलंबित केले. (Teacher Suspended)





भरतपूर विभागाच्या शालेय शिक्षण सहसंचालक कार्यालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, राजस्थान नागरी सेवा (वर्गीकरण, नियंत्रण आणि अपील) नियम, १९५८ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. निलंबनाच्या काळात संबंधित शिक्षिकेचे मुख्यालय धोलपूर जिल्ह्यातील राजाखेरा गट शिक्षण कार्यालयात राहणार असून त्यांना नियमानुसार निर्वाह भत्ता दिला जाणार आहे.


या प्रकरणाची सखोल विभागीय चौकशी सुरू असून, चौकशी अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. या संतापजनक घटनेनंतर शालेय जीवनावर प्रश्न चिन्ह उपस्थित केला जात आहे. (Rajasthan)

Comments
Add Comment

Palm Jaggery Export : भारताच्या सेंद्रिय पामिरा गुळाची बल्गेरियाला पहिली निर्यात; 1.755 टनांची खेप रवाना

नवी दिल्ली : भारताच्या पारंपरिक आणि पौष्टिक अन्नपदार्थांनी आता जागतिक पातळीवर आपली पाळेमुळे घट्ट करण्यास

Supreme Court Jobs: 10वी- 12वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी, सर्वोच्च न्यायालयात बंपर भरती; साठ हजारांहून अधिक असेल पगार

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टामध्ये तरूणांना नोकरी करण्याची संधी आहे. वेगवेगळ्या रिक्त पदांसाठी सुप्रीम

75 टक्के स्वदेशी तंत्रज्ञान! INS समर्थक भारतीय नौदलात दाखल, काय आहेत क्षमता?

नवी दिल्ली : भारतीय सागरी सुरक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलत भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘आयएनएस

सायबर सिक्युरिटीमध्ये करिअरची संधी? NISM चे 2 नवीन कोर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुंबई : आर्थिक आणि तांत्रिक सुरक्षेला बळ देण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्सने (एनआयएसएम) एक

Jai Meena Asian Games : "पंतप्रधानांनी पाठ थोपटत म्हटलं, 'धन्यवाद आपका'..."; आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचणाऱ्या जय मीनाच्या खास आठवणी!

जपानमधील आयची-नागोया येथे पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये (Aichi-Nagoya Asian Games 2026) भारताचा प्रतिभावान खेळाडू

Himachal Pradesh: बर्फवृष्टीमुळे हिमाचलमध्ये निसर्गाचं नयनरम्य दृश्य, धरतीवरील नंदनवनात हिवाळ्याची चाहूल!

शिमला शिमलातील बर्फवृष्टी पाहण्यासाठी असते. शिमलाचे फोटो सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बर्फवृष्टी