SIR Form : मतदारांसाठी दिलासा! राज्यातील निवडणूक आयोगाच्या SIR मोहिमेला दहा दिवसांची मुदतवाढ

मुंबई : मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (maharashtra  - SIR) अभियानाला महाराष्ट्रात १० दिवसांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने SIR प्रक्रियेचे वेळापत्रक सुधारित केले असून, मतदारांना नोंदणी, दुरुस्ती आणि हरकती नोंदवण्यासाठी अतिरिक्त वेळ उपलब्ध करून देण्यात आला आहे. (SIR Form)


निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार SIR अंतर्गत मतदारांच्या घराघरात जाऊन पडताळणी (BLO Verification) केली जात आहे. या प्रक्रियेद्वारे मतदार यादीतील दुबार नावे, स्थलांतरित मतदार, मृत व्यक्तींची नावे यांची तपासणी करून पात्र मतदारांची नोंद कायम ठेवण्याचा उद्देश आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या या अभियानासाठी मोठ्या प्रमाणावर बूथ लेव्हल ऑफिसर्स (BLO) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांना मतदार यादीतील नाव, पत्ता किंवा इतर तपशीलांमध्ये बदल करायचा असल्यास या कालावधीत अर्ज करता येणार आहे. (SIR Form)



SIR अभियानाचे सुधारित वेळापत्रक :


BLO मार्फत घराघरात भेटी : ३० जून ते ८ ऑगस्ट २०२६
मतदार केंद्रांचे पुनर्रचना/व्यवस्थापन : ८ ऑगस्ट २०२६
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध : १७ ऑगस्ट २०२६
दावे आणि हरकती दाखल करण्याचा कालावधी : १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६
अंतिम मतदार यादी प्रसिद्ध : १९ ऑक्टोबर २०२६ (SIR Form)



या मुदतवाढीमुळे मतदारांना आवश्यक कागदपत्रांसह आपली माहिती तपासण्याची आणि त्रुटी दुरुस्त करण्याची संधी मिळणार आहे. निवडणूक आयोगाने सर्व संबंधित अधिकारी आणि राजकीय पक्षांना सुधारित वेळापत्रकाची माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, नागरिकांनी SIR प्रक्रियेत सहभागी होऊन आपले नाव मतदार यादीत कायम असल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. (SIR Form)




Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने