Arnala Beach : अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर दुर्दैवी घटना! चौघेजण पोहायला गेले अन् काळाने घात घातला; दोन जण बेपत्ता

 पोहायला गेलेले चार मित्र समुद्रात वाहून गेले, दोघांची सुटका तर दोघांचा शोध सुरू




पालघर : पावसाळ्यात समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या चार मित्रांवर काळाने घाला घातला. पालघर (Palgahr) जिल्ह्यातील अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर अंघोळीसाठी उतरलेल्या चार तरुणांपैकी दोघांना सुखरूप वाचवण्यात यश आले असून, अन्य दोघे समुद्रात बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. ( Arnala Beach)



मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा येथील चार तरुण अर्नाळा (Arnala) समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेले होते. पावसाळ्यामुळे समुद्राला उधाण आलेले असतानाही ते अंघोळीसाठी पाण्यात उतरले. त्याचवेळी आलेल्या जोरदार लाटेने चौघांनाही खोल समुद्रात खेचले.




दोघांची सुटका


घटना लक्षात येताच स्थानिक नारिकांनी आरडाओरडा केला. त्यानंतर लाइफगार्ड, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने बचावकार्य सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर अबुल हसमुद्दीन शेख आणि मोसाद अफसर खान यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.



दोन जण बेपत्ता


मात्र, शोएन खान आणि अयान जाकीर हुसेन हे दोघे अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. समुद्रात मोठी भरती आणि प्रचंड लाटांमुळे शोधमोहीम राबवताना बचाव पथकाला अडचणी येत आहेत.


दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी नागरिकांना पावसाळ्यात समुद्रात उतरणे टाळण्याचे आवाहन केले आहे. समुद्र खवळलेला असताना जीव धोक्यात घालू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि