Tree Plantation : प्रकल्पात बाधित होणारी झाडे आता लावणार मुंबईतच

पर्यायी वृक्षारोपण आणि पुनर्रोपण मुंबईतच करण्याचे स्थायी समितीचे प्रशासनाला निर्देश


नगरसेवकांना जागा सुचवण्याची प्रशासनाने केली सुचना


मुंबई : मुंबईतील विविध प्रकल्प कामांमध्ये बाधित होणाऱ्या झाडांच्या बदल्यात लावण्या येणारी झाडे (Trees) ही मुंबईत जागा नसल्याने पनवेल तसेच इतर ग्रामीण भागातील वन विभागाच्या जमिनींवर लावण्यात येत आहे. परंतु याला स्थायी समिती सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला. मुंबई प्रकल्पातील बाधित होणाऱ्या झाडांच्या बदल्यात पर्यायी लावण्यात येणारी झाडे ही मुंबईतच लावली जावी, आरे कॉलनीसह ज्या जागांवरील झाडे पडली आहेत तिथे ती लावली जावी अशी मागणी सदस्यांनी केली आहे. त्यामुळे यापुढे मुंबईतील झाडे कापल्यास ती मुंबई (Mumbai) बाहेर लावली जावू नये असे निर्देशच प्रशासनाला स्थायी समिती अध्यक्षांनी दिले आहे. त्यावर अखेर प्रशासनाने आता नगरसेवकांनी जागा सुचवल्यास तिथे प्रकल्पांमधील बाधित झाडे किंवा अन्य प्रकारचे वृक्षारोपण केले जाईल असे स्पष्ट केले.


मुंबई महापालिकेच्यावतीने मुलुंड 'टी' विभागातील महाराणाप्रताप चौक एल बी एस रोड येथे आकाशमार्गिका अर्थात स्कायवॉकचे बांधकाम करण्यात येत आहे. या स्कायवॉकच्या कामासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आलेली असून या स्कायवॉकच्या बांधकामासाठी सुमारे २५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. परंतु या स्कायवॉकच्या बांधकामाला सुरुवात करण्यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणमध्ये एकूण १० वृक्ष बाधित होत असल्याचे दिसून आले. यामध्ये ७ वृक्ष कापणे, ३ वृक्षांची पुनर्रोपण करणे तसेच ५ झाडे आहे तिथे ठेवण्यात येणार आहे. ही झाडे पनवेल येथील वडघर या गावात ही झाडे लावली जाणार आहेत.



याबाबतचा प्रस्ताव मंजुरीला आला असता भाजपच्या नगरसेविका प्रिती सातम यांनी मुंबईतील या झाडांचे पुनर्रोपण आणि पर्यायी वृक्षारोपण (Tree Plantation) हे पनवेलमध्ये न करता मुंबईतील आरे कॉलनीमध्ये (Aarey Colony) करावी अशी कळकळीची विनंती केली. मुंबईतील झाडे कापल्यानंतर जर त्यांचे पुनर्रोपण आणि वृक्षारोपण जर मुंबईत केले तरच शहराचे पर्यावरण संतुलन राखले जाईल. यासाठी वन विभाग आणि दुग्ध विभागाची पत्रव्यवहार करून हे वृक्षारोपण केले जावे अशी मागणी करतानाच त्यांनी मुंबईमध्ये जास्तीत जास्त देशी झाडांची लागवड करावी. जेणेकरून त्यावर पक्षांचा किलकिलाट ऐकू येईल,असे त्यांनी सांगितले.


तर मनसेच यशवंत किल्लेदार यांनी मुंबईत पावसाळ्यात हजारो झाडे पडली असून त्या पडलेल्या जागांवर ही झाडे लावली जावी आणि देशी झाडे असावी. तर एमआयएमचे जमीर कुरेशी यांनी प्रकल्पांत बाधित होणाऱ्या झाडांचे पर्यायी वृक्षारोपण गोवंडी केली जावी अशी मागणी केली. खऱ्या अर्थाने गोवंडीत झाडांची जास्त गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तर मुंबईतले झाडे कापणार आणि मुंबईबाहेर लावणार हे उद्यान विभाग तसेच पर्यावरण विभाग कसे मान्य करते असा सवाल करत श्रध्दा जाधव यांनी यापुढे मुंबईतच झाडे लावली गेली पाहिजे असे सांगितले.


यावर अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांनी उद्यान विभागाने मुंबईत अशी झाडे लावण्यास जागा नसल्याने वन विभागाशी चर्चा करून पनवेलमध्ये पर्यायी वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु जर नगरसेवकांना पडलेल्या झाडांच्या जागी नव्याने झाडे लावायची असतील तर त्यांनी तसे सुचवावे. तिथे झाडे लावली जातील. याशिवाय जिथे मोकळी जागा आहे आणि तिथे झाडे लावता येतील अशा जागा नगरसेवकांनी सुचवल्या तर तिथे पर्यायी वृक्षारोपण करण्याचा निश्चितच विचार केला जाईल असे सांगितले. त्यावर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी यापुढे पर्यायी झाडे मुंबई बाहेर लावण्याचे प्रस्ताव आणले जावू नये तर ते मुंबईतील बाधित झाडे तोडल्यानंतर त्यांचे वृक्षारोपण हे मुंबईतच केले जावे असे निर्देश प्रशासनाला दिले.

Comments
Add Comment

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा

BMC Versova Project : वर्सोवा मलजल प्रक्रिया केंद्राच्या कामाला मार्च २०२७ ची डेडलाईन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरातील पर्यावरण संरक्षण आणि किनारपट्टीच्या पाण्याचा दर्जा सुधारण्याच्या