Vinayak Raut : विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या; २३ जुलैच्या सुनावणीपूर्वी कोर्टाने दिला मोठा झटका

मुंबई : ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. सून गिरीजा राऊत (Girija Raut) यांनी दाखल केलेल्या कौटुंबिक छळ आणि जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्ह्याप्रकरणी ठाणे न्यायालयाने राऊत आणि त्यांचा मुलगा गितेश राऊत यांना मोठा धक्का दिला आहे. अटकपूर्व जामीन अर्जावरील अंतिम सुनावणी होईपर्यंत अटक करू नये, अशी मागणी करणारा त्यांचा अंतरिम अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.


मुख्य अटकपूर्व जामीन अर्जावर अद्याप निर्णय झालेला नसला, तरी अंतरिम संरक्षण नाकारल्यामुळे विनायक राऊत (Vinayak Raut) आणि गितेश राऊत यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे कापूरबावडी पोलीस आवश्यक वाटल्यास चौकशीसाठी त्यांना कधीही ताब्यात घेऊ शकतात.



अजामीनपात्र कलमे असल्याचा दावा :


या प्रकरणातील फिर्यादी गिरीजा राऊत यांचे कायदेशीर सल्लागार ॲड. सागर कदम यांनी न्यायालयाच्या आदेशानंतर प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, या गुन्ह्यातील दोन कलमे अजामीनपात्र आहेत. त्यामुळे तपासादरम्यान ठोस पुरावे समोर आल्यास पोलिसांना आरोपींना अटक करण्याचा अधिकार आहे. (Vinayak Raut)



मुख्यमंत्र्यांकडे न्यायाची मागणी :


न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर गिरीजा राऊत यांनी समाधान व्यक्त करत पोलिसांनी या प्रकरणात लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी केली. तसेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून आपल्याला न्याय मिळवून द्यावा, अशी विनंतीही त्यांनी केली. गुन्हा दाखल झाल्यापासून राऊत कुटुंबीयांनी आपल्याशी कोणताही संपर्क साधलेला नसल्याचा दावाही त्यांनी केला. (Vinayak Raut)



नेमकं प्रकरण काय?


गिरीजा राऊत यांनी ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींकडून कौटुंबिक छळ होत असल्याची तक्रार दाखल केली आहे. तसेच काही भोंदू बाबांच्या माध्यमातून आपल्यावर जादूटोणा करण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. (Vinayak Raut)


या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कौटुंबिक छळ आणि महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत दोन भोंदू बाबांना अटक केली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. विनायक राऊत, गितेश राऊत आणि इतर संशयितांविरोधात तपास सुरू असून अटकपूर्व जामीन अर्जावरील पुढील सुनावणी २३ जुलै रोजी होणार आहे. (Vinayak Raut)

Comments
Add Comment

Versova Beach Dead Body : वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर गोणीत सापडला मृतदेह; 6 आरोपींना अटक

मुंबई : मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर 1 ऑक्टोबर रोजी गोणीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत