MahaCare : महाकेअरच्या माध्यमातून राज्यात जागतिक दर्जाच्या कर्करोग उपचार सुविधा; नागपुरात हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पाला मंजुरी

मुंबई : राज्यातील कर्करोग रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार आणि संशोधन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन (महाकेअर)च्या माध्यमातून व्यापक आराखडा राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाकेअरच्या संचालक मंडळाच्या पहिल्या बैठकीत यासंदर्भातील अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. (MahaCare)

मुख्यमंत्र्यांनी राज्यभर आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कर्करोग उपचार व्यवस्था उभारण्याचे निर्देश दिले. निदानापासून उपचारापर्यंत प्रत्येक रुग्णाला समान आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, यासाठी महाकेअरची भूमिका महत्त्वाची राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संस्थेसाठी उच्च क्षमतेचे मनुष्यबळ तयार करण्यावर भर देण्याचे निर्देशही दिले.



बैठकीत नागपूरमध्ये 'नागपूर हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रोजेक्ट' या उपकंपनीची स्थापना करण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच महाकेअरच्या कॉर्पस निधीसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून 100 कोटी रुपयांचा निधी देण्यास तत्त्वतः मान्यता देण्यात आली. याशिवाय सामाजिक उत्तरदायित्व निधी स्वीकारणे, कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देणे, लेखापरीक्षक आणि कंपनी सचिवांची नियुक्ती तसेच विविध सल्लागार नेमण्यालाही मंजुरी देण्यात आली. ( Cancer Treatment)

या बैठकीत महाकेअर आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांच्यात तांत्रिक सहकार्याचा सामंजस्य करारही करण्यात आला. या सहकार्यामुळे राज्यातील कर्करोग उपचार व्यवस्था अधिक सक्षम करण्यास मदत होणार आहे.  ( Tata Memorial Hospital)



महाकेअरच्या माध्यमातून मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नांदेड, कोल्हापूर, चंद्रपूर, नाशिक आणि अमरावती येथे सर्वसमावेशक कर्करोग उपचार केंद्रे उभारली जाणार आहेत. तसेच मुंबई, रत्नागिरी, सातारा, बारामती, जळगाव, यवतमाळ, अंबाजोगाई, ठाणे आणि शिर्डी येथे निदान व डे-केअर केंद्रे सुरू करण्याची योजना आहे.

राज्यभर कर्करोग उपचार अधिक सुलभ, परवडणारे आणि दर्जेदार करण्यासाठी महाआरोग्य प्रकल्पाच्या माध्यमातून ही संपूर्ण योजना टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे.

 
Comments
Add Comment

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा

BMC Versova Project : वर्सोवा मलजल प्रक्रिया केंद्राच्या कामाला मार्च २०२७ ची डेडलाईन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरातील पर्यावरण संरक्षण आणि किनारपट्टीच्या पाण्याचा दर्जा सुधारण्याच्या