Devendra Fadnavis : तटकरे - पटेलांनंतर पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

- महायुतीतील समन्वय आणि पक्षांतर्गत नाराजीवर चर्चा; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते पार्थ पवार (Parth Pawar) यांनी गुरुवारी मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची घेतलेली थेट भेट सध्या राजकीय वर्तुळात कमालीची चर्चेत आली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या अचानक भेटीमुळे पक्षांतर्गत निर्माण झालेली धुसफूस आणि महायुतीतील समन्वयाच्या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा झाल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. या भेटीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसली, तरी या नव्या घडामोडीने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. (Parth Pawar Meeting)



काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कार्याध्यक्ष प्रफुल पटेल ( Praful Patel) यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मात्र, या भेटीबद्दल सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्षातील प्रमुख नेत्यांनाच अंधारात ठेवून झालेल्या या भेटीमुळे सुनेत्रा आणि पार्थ नाराज असल्याचे बोलले जात होते. महायुतीमध्ये आणि पक्षात अशी नाराजी असणे योग्य नसल्याचे मत पार्थ पवार यांनी या भेटीत मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्याचे समजते. त्यावर, 'यापुढे असे होणार नाही आणि योग्य समन्वय साधला जाईल', अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ( Mahayuti)




जयंत पाटलांचे काय?


- दुसरीकडे, जयंत पाटील आणि भाजप नेते विनोद तावडे यांची मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेली भेट, त्यापाठोपाठ ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट, आणि त्यानंतर जयंत पाटलांसह प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या वर्षा बंगल्यावरील चकरा या सर्व घटनाक्रमातून राज्यात नवीन राजकीय समीकरण आकाराला येत असल्याचे स्पष्ट होत आहे.



- जयंत पाटील यांनी ईश्वरपूरच्या नगराध्यक्षांना तडकाफडकी बाजूला केल्याचे प्रकरण घेऊन वर्षा निवासस्थानी गेल्याचा दावा केला असला, तरी तिथे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दोघेही नेते उपस्थित असल्याचे समोर आले होते. त्यानंतर जयंत पाटील (Jayant Patil) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली. राष्ट्रवादीकडे पुन्हा एकदा अर्थखाते दिल्यास शिवसेना आमदारांच्या निधीवाटपावर अन्याय होईल, अशी भावना एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखविल्याचे समजते.



- मात्र, गेल्या दहा दिवसांत शरद पवार आणि अजित पवार गटातील नेत्यांची यांची भाजप (BJP) व शिवसेनेशी (Shivsena) वाढलेली सलगी पाहता, राज्यात लवकरच मोठा राजकीय फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा