Central Railway Mega Block : मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक, प्रवाशांचे हाल होणार

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे रविवार १९ जुलै २०२६ रोजी उपनगरीय मार्गांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी 'मेगा ब्लॉक' घेण्यात येणार आहे. पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी हा 'मेगा ब्लॉक' आवश्यक आहे. यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे. (Mumbai Local)


मेन लाईन : विद्याविहार आणि ठाणे दरम्यान ५व्या आणि ६व्या मार्गिकेवर सकाळी ८.०० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत.


निवडक 'डाऊन' मेल/एक्सप्रेस गाड्या विद्याविहार स्थानकावर 'डाऊन जलद' मार्गिकेवर वळवल्या जातील आणि ठाणे स्थानकावर पुन्हा ५व्या मार्गिकेवर वळवल्या जातील; परिणामी त्या १० ते १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. (Railway Update)



• गाडी क्रमांक 11055 लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर एक्सप्रेस
• गाडी क्रमांक 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस -जयनगर एक्सप्रेस
• गाडी क्रमांक 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस- तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस
• गाडी क्रमांक 17222 लोकमान्य टिळक टर्मिनस- काकीनाडा पोर्ट एक्सप्रेस


निवडक 'अप' मेल/एक्सप्रेस गाड्या ठाणे स्थानकावर 'अप जलद' मार्गिकेवर वळवल्या जातील आणि विद्याविहार येथे पुन्हा ६ व्या मार्गिकेवर वळवल्या जातील; परिणामी त्या आपल्या गंतव्य स्थानावर १० ते १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.



• गाडी क्रमांक 11010 पुणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्सप्रेस
• गाडी क्रमांक 12124 पुणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन
• गाडी क्रमांक 12134 मंगळुरू -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
• गाडी क्रमांक 13201 राजगीर - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
• गाडी क्रमांक 17221 काकीनाडा पोर्ट- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
• गाडी क्रमांक 12126 पुणे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रगती एक्सप्रेस
• गाडी क्रमांक 22226 सोलापूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस.
• गाडी क्रमांक 12168 बनारस -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
• गाडी क्रमांक 12321 हावडा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
• गाडी क्रमांक 12812 हटिया - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस


ट्रान्स-हार्बर लाईन: ठाणे आणि वाशी/नेरुळ दरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत. (Sunday Mega Block)


ब्लॉकच्या कालावधीत ठाणे आणि वाशी/नेरुळ/पनवेल दरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.


ठाणे येथून सकाळी १०.३५ ते सायंकाळी ४.०७ वाजेपर्यंत सुटणाऱ्या वाशी/नेरुळ/पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन ट्रान्स-हार्बर सेवा रद्द राहतील.


पनवेल/नेरुळ/वाशी येथून सकाळी १०.२५ ते सायंकाळी ४.०९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या ठाण्याकडे येणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर सेवा रद्द राहतील.

Comments
Add Comment

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून