Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र उपजिल्हाधिकारी ; राज्य शासनाचा मोठा निर्णय

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मोठा निर्णय घेत कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र उपजिल्हाधिकारी पद निर्माण करण्यास मंजुरी दिली आहे. तात्पुरत्या स्वरुपात हे उपजिल्हाधिकारी (वर्ग अ) संवर्गातील पद निर्माण करण्यात येणार असून याबाबतचा शासन निर्णय काढण्यात आला आहे. दरम्यान, नाशिकसाठी कायमस्वरूपी स्वागत अधिकारी नियुक्त करण्याची जिल्हा प्रशासनाची मागणी शासनाने फेटाळली आहे.


१२ वर्षानंतर होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा अनेक कारणांमुळे महत्त्वाचा असतो. त्यामुळे लाखो लोक कुंभमेळ्यात सहभागी होतात. त्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेता तिचे नियोजन करणे प्रशासनासाठी तारेवरची कसरत ठरते. तर अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या (VVIP) प्रोटोकॉलची जबाबदारी सक्षमपणे पार पाडण्यासाठी राज्य शासनाने उपजिल्हाधिकारी दर्जाच्या स्वागत अधिकारी पदास मंजुरी दिली आहे.



महत्त्वाचे म्हणजे, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण करण्यात येणारे उपजिल्हाधिकारीपद, हे केवळ १ ऑगस्ट २०२६ ते ३१ ऑगस्ट २०२८ या दोन वर्षांच्या कालावधीपुरतेच मर्यादित राहणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान देश-विदेशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, मान्यवर आणि विविध शासकीय प्रतिनिधींच्या वाढत्या भेटींचे नियोजन, प्रोटोकॉल व समन्वय प्रभावीपणे करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.


या पदासाठी सातव्या वेतन आयोगानुसार एस-२० वेतनश्रेणी लागू राहणार असून, वार्षिक अंदाजित खर्च सुमारे १४.०१ लाख रुपये इतका अपेक्षित आहे. शासन निर्णयानुसार हे पद केवळ सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कालावधीपुरतेच अस्तित्वात राहील. ३१ ऑगस्ट २०२८ नंतर हे तात्पुरते पद आपोआप रद्द होऊन त्याऐवजी पूर्वीप्रमाणे स्वागत अधिकारी (वर्ग-३) हे पद पुन्हा कार्यरत राहील.

Comments
Add Comment

Ranbali Movie Review : कागदावर धमाकेदार, पण पडद्यावर फिका? 'रणबाली' चित्रपट कसा आहे ?

साऊथचा लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडाच्या (Vijay Devarkonda) बाबतीत एकच गोष्ट वारंवार घडताना दिसते. त्याच्या एखाद्या

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले

IND vs WI 5th T20I: बंगळुरूत तीन बदल केले तरच टीम इंडियाचं विजयाचं गणित सुटणार! समजून घ्या

भारत आणि वेस्ट इंडिज टी20 मालिका आता रंगतदार वळणावर आहे. कारण वेस्ट इंडिजने भारतीय संघाला या मालिकेत तोडीस तोड

Unknown Calls Block Scheme : खूशखबर! फसव्या कॉल्सची आता खैर नाही; केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय!

नवी दिल्ली : अनोळखी (Unknown) नंबरवरून येणारे फेक कॉल्स आणि सायबर फसवणुकीच्या त्रासाला आता कंटाळलात का? तर तुमच्यासाठी

Milind Soman Fitness : वयाच्या 60 व्या वर्षीही फिटनेस जबरदस्त! मिलिंद सोमण यांचा 15 मिनिटांचा वर्कआउट आणि फिटनेस मंत्र

Milind Soman Fitness Routine : वयाच्या ६० व्या वर्षीही उत्तम फिटनेस आणि उत्साह कायम ठेवणारे अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण

Nashik Crime : नराधमाला फाशीच ! डोंगराळे बालिका अत्याचार व हत्या प्रकरणात विजय खैरनारला फाशीची शिक्षा, जलदगती न्यायालयाचा मोठा निकाल

Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचार वर्षांच्या बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि