Nitesh Rane : सिंधुदुर्ग ग्लोबल इंडस्ट्रियल रिजनच्या (SGIR) विकासाला गती; औद्योगिक व पर्यटन पायाभूत सुविधांवर भर

मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत सादरीकरण


मुंबई : सिंधुदुर्ग ग्लोबल इंडस्ट्रियल रिजन (SGIR) प्रकल्पाच्या दूरदृष्टी, धोरणात्मक आराखडा आणि अंमलबजावणीच्या कृती आराखड्याबाबत मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. बैठकीस सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे दूरदृश्य प्रणालीद्वारे तसेच संबंधित तांत्रिक पथकाचे प्रतिनिधी उपस्थित होते.




यावेळी सिंधुदुर्गच्या सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाला चालना देणारा औद्योगिक परिसर उभारण्यावर भर देण्यात आला. नवीन प्रकल्प विकसित करताना औद्योगिक, सामाजिक आणि संस्थात्मक पायाभूत सुविधांचा समतोल विकास साधत संपूर्ण परिसंस्था (Ecosystem) उभारण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.सादरीकरणामध्ये उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करून बहुआयामी औद्योगिक विकासाला चालना देणे, विद्यमान पायाभूत सुविधांच्या आधारे प्रगत उत्पादन क्षेत्र विकसित करणे तसेच ‘युथ सिटी’ संकल्पनेद्वारे शिक्षण, क्रीडा, पर्यटन आणि आधुनिक सामाजिक व संस्थात्मक पायाभूत सुविधांचा समन्वित विकास साधण्याचा आराखडा मांडण्यात आला. प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया आणि पुढील कार्यवाहीबाबतही माहिती सादर करण्यात आली.या प्रकल्पाच्या माध्यमातून उद्योग, पर्यटन, शिक्षण आणि आधुनिक पायाभूत सुविधांचा समन्वित विकास साधत सिंधुदुर्गला गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि शाश्वत आर्थिक विकासाचे नवे केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने नियोजनबद्ध कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले. (Nitesh Rane)

Comments
Add Comment

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा