Rohit Sharma : रोहित शर्माला निवृत्त झाला तरी दरवर्षी BCCI देणार इतक्या लाखांची पेन्शन

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा सध्या जोरात सुरू आहेत. मात्र अद्याप बीसीसीआय किंवा रोहितने या बाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. अशातच,निवृत्तीनंतर रोहितला बीसीसीआयकडून दरवर्षी ₹८.४० लाखांची पेन्शन मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.बीसीसीआय हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असून, तो माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू,प्रथम श्रेणी क्रिकेटपटू आणि महिला क्रिकेटपटूंनाही पेन्शन देतो. बीसीसीआयने २०२२ मध्ये पेन्शनच्या रक्कमेत वाढ करण्यात आली होती. (Rohit Sharma)



बीसीसीआयचे सध्याचे पेन्शन स्लॅब


१.२५ किंवा त्याहून अधिक कसोटी सामने खेळलेले माजी पुरुष क्रिकेटपटू – दरमहा ७०,००० रुपये
२.२५ पेक्षा कमी कसोटी सामने खेळलेले माजी पुरुष क्रिकेटपटू – दरमहा ६०,००० रुपये
३.२००३ पूर्वी निवृत्त झालेले पुरुष प्रथम-श्रेणी क्रिकेटपटू (२५-४९ सामने) – दरमहा ३०,००० रुपये
४.२००३ पूर्वी निवृत्त झालेले पुरुष प्रथम-श्रेणी क्रिकेटपटू (५०-७४ सामने) – दरमहा ४५,००० रुपये
५.२००३ पूर्वी निवृत्त झालेले पुरुष प्रथम-श्रेणी क्रिकेटपटू (७५ किंवा अधिक सामने) – दरमहा रु. ५२,५००
६.महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटर – दरमहा ५२,५०० रुपये
७.२००३ पूर्वी निवृत्त झालेल्या महिला प्रथम-श्रेणी क्रिकेटपटू – दरमहा ४५,००० रुपये





सध्याच्या नियमानुसार,२५ किंवा त्याहून अधिक कसोटी सामने खेळलेल्या माजी पुरुष क्रिकेटपटूंना दरमहा ₹७०,००० पेन्शन दिली जाते. रोहित शर्माने आतापर्यंत ६७ कसोटी सामने खेळले असल्याने, तो या सर्वोच्च श्रेणीत पात्र ठरतो. यामुळे निवृत्तीनंतर रोहित शर्माला दरमहा ₹७०,०००, म्हणजेच दरवर्षी ₹८.४० लाख पेन्शन मिळेल. याचा सरासरी हिशोब केला तर त्याला दररोज सुमारे ₹२,३०० इतकी रक्कम पेन्शनच्या स्वरूपात मिळेल.दरम्यान, रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणार का ? याकडे संपूर्ण क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले असून, याबाबत सध्या अधिकृत घोषणा झालेली नाही. यामुळे लॉर्डसवरील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढलेली दिसत आहे.(Riterment News)



रोहितचे आईवडील लंडनमध्ये


लॉर्ड्सवर रंगणार असलेला भारत विरुद्ध इंग्लंड हा तिसरा एकदिवसीय सामना बघण्यासाठी रोहित शर्माचे आईवडील लंडनमध्ये पोहोचले असल्याचे वृत्त आहे. या वृत्तामुळेच रोहित शर्मा निवृत्त होत असल्याच्या चर्चेने जोर पकडला आहे. दरम्यान एक - दोन सामन्यात जास्त धावा झाल्या नसल्या तरी चिंतेचे कारण नाही. रोहित शर्माला तिसऱ्या सामन्यात सूर गवसू शकतो, अशी आशा टीम इंडियाच्या बॅटिंग कोच सितांशुने व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम

Dwayne Bravo No. 47 retired : ट्रिनबागो नाइट रायडर्सकडून ड्वेन ब्राव्होची ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

नवी दिल्ली : ट्रिनबागो नाइट रायडर्स (टीकेआर) संघाने ड्वेन ब्राव्होची प्रतिष्ठित ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त