Nashik : राज्यातील उत्कृष्ट तपासांचा यादीत नाशिक पोलिसांचा 'हा' तपास; डीजीपींच्या अधिकृत अभ्यासपुस्तिकेत थेट समावेश

Nashik : मोबाईल सीडीआर नाही, सीसीटीव्ही फुटेज नाही आणि प्रत्यक्ष साक्षीदारही नाही तरीही अवघ्या एका रेल्वे तिकिटाच्या (Railway Ticket) तुकड्यावरून नाशिक पोलिसांनी (Nashik Police) सात दिवसांत हरियाणातून (Haryana) मारेकऱ्यांना गजाआड केलेला तपास आता संपूर्ण महाराष्ट्रातील पोलीस अधिकाऱ्यांसाठी अभ्यासाचा विषय ठरला आहे.


पाथर्डी फाटा (Pathardi Phata) परिसरातील योगेश मोगरे हत्याकांडाचा (Yogesh Mogre Murder Case) तपास महाराष्ट्र पोलीस महासंचालकांनी राज्यस्तरीय उत्कृष्ट गुन्हे अन्वेषणाच्या केस स्टडीत (State-level case studies of excellent crime investigations) समाविष्ट केला आहे. कोणतेही डिजिटल पुरावे नसताना तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त आनंदा वाघ, सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पीएसआय पोपट कारवाळ आणि हवालदार प्रशांत वालझाडे यांच्या पथकाने केवळ पारंपरिक तपास पद्धतीचा आधार घेत हा गुन्हा उघडकीस आणला. ( Nashik News )



एका तिकिटावरून शोधले आरोपी


गुन्ह्याची कोणतीही पार्श्वभूमी नसताना घटनास्थळी मिळालेल्या एका तिकिटाची बारीक लिंक जोडत या पथकाने थेट हरियाणातील (Haryana) गुन्हेगारीचे केंद्र समजले जाणारे सोनपत आणि रोहतक गाठले आणि दोन्ही संशयित मारेकऱ्यांना जेरबंद केले होते. यामध्ये ३० मार्च २०२३ रोजी पहिल्या विधिसंधर्षित संशयिताला ताब्यात घेण्यात आले तर ४ एप्रिल २०२३ रोजी मुख्य संशयितास अटक करून मोगरे यांची कार जप्त काण्यात आली. घटनेतील सर्व डिजिटल रस्ते बंद असतानाही, तत्कालिन सहायक पोलीस आयुक्त आनंदा वाघ, सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पीएसआय पोपट कारवाळ आणि हवालदार प्रशांत वालझाडे यांनी केवळ फिजिकल पोलिसिंगचा कसब वापरून हा गुंतागुंतीचा गुन्हा उघडकीस आणला. ( Nashik News )



डीजीपींच्या अधिकृत अभ्यासपुस्तिकेत समावेश


पोलीस दलात दरवर्षी हजारो गुन्हे उघडकीस येतात, मात्र ज्या गुन्ह्यांमध्ये कोणताही ठोस पुरावा नसताना निव्वळ बुद्धिमत्ता आणि पारंपरिक तपासाच्या जोरावर छडा लावला जातो, अशा मोजक्याच प्रकरणांना स्टेट केस स्टडीचा मान मिळतो. नाशिकमधील महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये (Maharashtra Police Academy) भावी पोलिस उपअधीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षकांना ‘अतिशय प्रतिकूल परिस्थितीत पुरावा कसा शोधायचा’ हे शिकवण्यासाठी आता नाशिक पोलिसांच्या या मार्गदर्शक समावेश तपासाचा पाठ्यपुस्तकात करण्यात आला आहे. राज्यातील उत्कृष्ट तपासांमधून नाशिकच्या या प्रकरणाचा डीजीपींच्या अधिकृत अभ्यासपुस्तिकेत थेट समावेश झाल्याने नाशिक पोलिसांच्या कर्तव्यदक्षत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments
Add Comment

IND vs WI: वेस्ट इंडिजसमोर भारताचा 'अभेद्य किल्ला'! 7 वर्षांचे वर्चस्व राखण्याचे टीम इंडियासमोर आव्हान

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचा निर्णय शेवटच्या सामन्यावर येऊन ठेपला आहे. 17

Yo Yo Honey Singh : 'यो यो हनी सिंग'च्या अडचणीत मोठी वाढ! आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलचा मोठा दणका

प्रसिद्ध रॅपर आणि संगीतकार हिरदेश सिंग, ज्यांना जगभर 'यो यो हनी सिंग' (Yo Yo Honey Singh) या नावाने ओळखले जाते, त्यांच्यामागील

Prime Video Chaar Yaar : प्राइम व्हिडिओच्या ‘चार यार’चा ट्रेलर प्रदर्शित; २००० च्या दशकातील मुंबईत उलगडणार गुन्हेगारी आणि मैत्रीची अनोखी कहाणी!

एक्सक्लुझिव्ह ओरिजिनल्ससाठी ओळखली जाणारी भारतातील आघाडीची स्ट्रीमिंग सेवा प्राइम व्हिडिओने आज आपल्या आगामी

Versova Beach Dead Body : वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर गोणीत सापडला मृतदेह; 6 आरोपींना अटक

मुंबई : मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर 1 ऑक्टोबर रोजी गोणीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

पुरूष क्रिकेटपटूंनाही जे जमलं नाही, ते स्मृती मंधाना करणार! फक्त 133 धावा करताच रचणार ऐतिहासिक महाविक्रम

[caption id="attachment_1066855" align="aligncenter" width="800"] भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात 16 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या

Nashik News : सरकारी कार्यालयातच महिला अधिकाऱ्याने संपवलं जीवन , नाशिकमध्ये खळबळ

Malegaon News : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मालेगाव शहरातील सहकार निबंधक कार्यालयातील