Ashok Kharat : अशोक खरातचा पाय खोलात ! ईडीचे तब्बल 3000 पानांचे आरोपपत्र; रिमोटचा साप अन् ...

Ashok Kharat: नाशिक काय तर संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या अशोक खरातच्या अडचणीत नव्याने वाढ झाली आहे. धर्माच्या नावाखाली आणि चमत्काराचा खोटा आव दाखवत निष्पाप भक्तांना कोट्यवधी रुपयांना लुटणाऱ्या आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्या अशोक खरात विरोधात तब्बल 3000 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले. अंमलबजावणी संचालनालयाने ही कारवाई केली आली या आरोपपत्रात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहे. आरोपपत्रात भोंदू खरातच्या आजवरच्या काळ्या कारनाम्यांचा संपूर्ण लेखाजोखा मांडण्यात आला आहे. तब्बल 30 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. भोंदूबाबा खरातच्या संपत्तीचा संपूर्ण तपशीलच यात देण्यात आला आहे.



रिमोट कंट्रोलने चालणारे कृत्रिम साप अन्


ईडीने आरोपपत्रात दिलेल्या माहितीनुसार, अशोक खरात हा स्वतःला भगवान शिवाचा अवतार असल्याचा भक्तांना सांगायचं. भक्तांवर स्वतःचा प्रभाव निर्माण करण्यासाठी तो धार्मिक कार्यक्रमांमध्ये हायटेक तंत्रज्ञानाचा गैरवापर करायचा. लोकांना खोट्या शक्तीची भुरळ पाडण्यासाठी तो रिमोट कंट्रोलने चालणारे कृत्रिम साप वापरायचा, तसेच वाघाच्या कातड्याचा वापर करून आपल्याकडे अलौकिक शक्ती असल्याचा आभास निर्माण करायचा. इतकेच नव्हे तर, महिला भक्तांना गुंगीचे औषध दिल्याचाही खुलासा आरोपपत्रात करण्यात आला आहे.



पॉलिश केलेले चिंचोके 2 लाख रुपयांना


त्यासोबतच, बाजारात कवडीमोल भावाने मिळणारे चिंचोके त्याने पॉलिश करुन त्याने ते प्रत्येकी 2 लाख रुपयांना विकले. तसेच खडे आणि मधाच्या बाटल्यांना प्रत्येकी 9 लाख रुपयांना विकून त्याने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचं आरोपपत्रात नमूद आहे. खरातचे श्रीमंत व्यावसायिकांना टार्गेट करत असे. दैवी प्रकोप तसेच कुटुंबातील अत्यंत जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होणार आहे, तुमचा व्यवसाय पूर्णपणे कोलमडणार अशी भीती तो श्रीमंतांच्या मनात घालायचा. या भितीपोटी घाबरलेले व्यावसायिक त्याच्या जाळ्यात ओढले जायचे आणि त्यानंतर हा भोंदू बाबा 'अवतार पूजा' आणि मोठ्या देणग्यांच्या नावाखाली त्याने कोट्यावधी रुपये उकळायचा.



142 बेनामी खात्यांमधून कोट्यवधींची उलाढाल


लोकांना लुटून कमावलेली ही काळी कमाई पांढरी करण्यासाठी खरातने मोठा कट रचला होता. त्याने तब्बल 142 बेनामी खात्यांमधून कोट्यवधी रुपयांची उलाढाल केली. सहकारी पतसंस्था, बेनामी बँक खाती, त्याचे कुटुंबीय आणि निकटच्या साथीदारांच्या माध्यमातून त्याने या पैशांचे कथित मनी लॉन्ड्रिंग केले. हा सगळा पैसा त्याने महाराष्ट्रातील विविध भागांत रिअल इस्टेट आणि आलिशान मालमत्तांमध्ये गुंतवल्याचा गंभीर आरोप ईडीने केला आहे. ईडीच्या या 3000 पानांच्या आरोपपत्रामुळे आता या भोंदू बाबाचा पाय आणखी खोलात गेला आहे.



आतापर्यंत 19.20 कोटींची मालमत्ता जप्त


या प्रकरणात आतापर्यंत 19.20 कोटींची स्थावर मालमत्ता तात्पुरत्या स्वरुपात जप्त करण्यात आली आहे. तर 17.70 कोटींची रोकड, बँक ठेवी, विदेशी चलन, सोने-चांदीचे दागिने आणि अलिशान मर्सिडीज जप्त करण्यात आली आहे. खरात यांचे सहकारी अरविंद बावाके यांनी 18 ते 20 कोटींच्या रोख व्यवहारांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप आहे. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील एका सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष नामकरण आवारे यांनी 34 बेनामी खाती उघडण्यास मदत करून व्यवहार लपवल्याचे तपासात समोर आलं आहे. 

Comments
Add Comment

पुण्यात भरधाव कारचा थरार! एमआयटी कॉलेज रोडवर 3 ते 4 दुचाकींना धडक; 24 वर्षीय चालक पोलिसांच्या ताब्यात

पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरात भरधाव कारने अनेक दुचाकींना धडक दिल्याची घटना समोर आली आहे. एमआयटी

Pune Weather : उकाड्यापाठोपाठ पुण्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट' जारी

पुणे : गेल्या काही दिवसांपासून वाढलेली ऑक्टोबर हीट आणि प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांसाठी एक

Yashasvi Jaiswal ODI Snub : यशस्वी जयस्वालला वनडे संघातून डावललं! आर. अश्विन संतापला; निवडकर्त्यांना सुनावलं, म्हणाला ‘हा अन्याय!’

भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल याला न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत संधी न मिळाल्याने

White House : अवघ्या पाच दिवसांत केटी झकारिया यांची व्हाइट हाऊसमधून एक्झिट; बार परीक्षा वादामुळे पद गमावले!

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनात व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी म्हणून

Wasim Jaffer : टीम इंडियाला मिळणार नवा मुख्य निवडकर्ता? 31 कसोटी खेळलेल्या दिग्गजाचे नाव चर्चेत; BCCI च्या निर्णयाकडे लक्ष!

Wasim Jaffer : भारतीय क्रिकेटमध्ये सध्या नव्या मुख्य निवडकर्त्याच्या नियुक्तीची चर्चा रंगली आहे. भारताकडून 31 कसोटी

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल; छातीत संसर्ग, प्रकृती स्थिर

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना छातीत संसर्ग झाल्याने दिल्लीतील अपोलो