Mumbai Mayor : त्यांनी पेंग्विन आणला, आम्ही सिंह आणणारच; महापौर स्वत: अधिकाऱ्यांसह गुजरातला जाणार

पेंग्विन खाली मान करून उभे असतात म्हणून पहायला आवडतात


मुंबई : भायखळा येथील राणीबागेतील प्राणिसंग्रहालयात आधीच्या सत्ताधाऱ्यांनी पेंग्विन (Penguin) आणले असले तरी आम्ही गुजरातहून सिंह (Lion) आणणारच असा स्पष्ट निर्धार पुन्हा एकदा बोलून दाखवत आपण स्वत: यासाठी गुजरातला जाणार असल्याचे महापौर रितू तावडे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना सांगितले. तसेच या प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन पहायला मला कायम आवडतात. कारण ते कायम खाली मान खालून असतात आणि त्यांना खाली मान घालून उभे राहिल्याचे पाहून बरे वाटते असे सांगत एकप्रकारे त्यांनी पेंग्विनची उपमा दिली जाणाऱ्या उबाठाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.



मुंबईतील (Mumbai) भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान प्राणीसंग्रहालयात आशियाई सिंह आणण्यासाठी मुंबईच्या महापौर रितू तावडे (Ritu Tawde) यांनी गुजरातच्या सक्करबाग प्राणिसंग्रहालयाला मागील एप्रिल महिन्यात पत्र लिहिले होते. त्यामुळे हा सिंह आणण्यासाठी महापौरांनी पुढाकार घेवूनही चार महिने उलटले, तरीही सिंह काही आलेला नाही. याबाबत पत्रकारांनी महापौरांना विचारले असता, त्यांनी सिंहाचा पिंजरा तयार असून याबाबत प्राणिसंग्रहालयांशी पत्रव्यवहार सुरु असून स्वत: आमदार पराग शाह हे देखील तेथील प्राणिसंग्रहालयाशी बोलत आहे. त्यामुळे सिंह आणण्यासाठी आमदार आणि अधिकाऱ्यांसोबत जावून सिंहाची जोडी आणू. त्यांनी पेंग्विन आणला असला तरी आम्ही सिंह आणू असे महापौरांनी सांगितले. यासाठी तेथील प्राणिसंग्रहालयाची मान्यताही मिळाली आहे. त्यांना याबदल्यात कपाचिन मंकीची जोडी द्यायची आहे. ही जोडी दिल्यानंतर सिंहाची जोडी आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे लवकरच ही जोडी मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच पेंग्विनबाबत विचारले असता ते म्हणाले, प्राणिसंग्रहालयात पेंग्विन पहायला मला अावडते. कारण हे पेंग्विन शांतपणे खाली मान घालून उभे असता. ते वर मान करून बघत नाही. हे सांगताना त्यांनी मी फक्त पेंग्विन पक्षीबाबत बोलते, याचा अर्थ कुठे अन्य कडे लावू नये असे सांगितले. तसेच येथील पिंजऱ्यातील वाघाला नियमित वेळेवर मांसमटण दिले जाते. तसेच त्याला वजनानुसार त्यांना मांस दिले जाते. त्यांना एक दिवस उपाशी ठेवले जाते. आणि त्यांच्या आरोग्याची तपासणीही केली जाते. त्यामुळे वाघाचीही काळजी घेतली जाते. तसेच प्राणिसंग्रहालयात एका प्राण्याचा मृत्यू झाला असून हा मृत्यू वृध्दपकाळाने झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने