Supreme Court : 'मादर***' आणि 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील नाहीत? सर्वोच्च न्यायालयाचा अजब दावा

नवी दिल्ली : शिवीगाळ आणि अश्लीलतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत मोठा निर्णय दिला आहे. 'Motherfker'** आणि 'Son of a Whe'** यांसारखे अपमानास्पद किंवा असभ्य शब्द वापरणे हे नैतिकदृष्ट्या अयोग्य असले, तरी ते फौजदारी कायद्यानुसार आपोआप 'अश्लील' (Obscene) ठरत नाहीत, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.


न्यायमूर्ती संजय करोल आणि विपुल एम. पांचोली यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय देताना स्पष्ट केले की, एखादा शब्द कायद्याच्या दृष्टीने अश्लील ठरण्यासाठी तो कामुक भावना चिथावणारा, लैंगिक स्वरूपाचा किंवा नैतिक अधःपतनास प्रवृत्त करणारा असणे आवश्यक आहे. केवळ अपमान करण्यासाठी वापरलेले असभ्य किंवा शिवीगाळीचे शब्द अश्लीलतेच्या व्याख्येत बसत नाहीत. (Supreme Court)



हा निर्णय जमिनीच्या वादातून झालेल्या भांडणाशी संबंधित प्रकरणात देण्यात आला. या प्रकरणात आरोपीवर "Motherfker"** आणि "Son of a Whe"** असे शब्द वापरल्याचा आरोप होता. खालच्या न्यायालयाने त्याला अश्लीलतेच्या आरोपाखाली दोषी ठरवले होते. मात्र, आरोपी मणी याने दाखल केलेल्या अपीलावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने त्या निर्णयाला अंशतः दिलासा दिला. (Supreme Court)



'अश्लीलता' आणि 'शिवीगाळ' यात स्पष्ट फरक : 


निर्णयात न्यायालयाने स्पष्ट केले की, 'अश्लीलता' (Obscenity) आणि 'असभ्य भाषा, शिवीगाळ किंवा अपशब्द' (Vulgarity, Abuse, Profanity) या दोन्ही संकल्पना वेगळ्या आहेत. एखादा शब्द कितीही आक्षेपार्ह, असंस्कृत किंवा अपमानास्पद असला तरी तो केवळ त्या कारणामुळे कायद्याच्या दृष्टीने अश्लील ठरत नाही. (Supreme Court)


न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, अशा शब्दांमुळे एखाद्या व्यक्तीला संताप, तिरस्कार, किळस किंवा मानसिक धक्का बसू शकतो. मात्र, त्यामुळे ते शब्द भारतीय फौजदारी कायद्यानुसार 'अश्लील' ठरत नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले.



सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) या निर्णयामुळे अश्लीलता आणि अपमानास्पद भाषेच्या कायदेशीर व्याख्येबाबत महत्त्वाची स्पष्टता मिळाली असून, भविष्यात अशा स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये या निर्णयाचा संदर्भ महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Saurabh Rajput Murder Case : सौरभ राजपूत हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा; निर्भया प्रकरणातील जल्लाद पवन यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Saurabh Rajput Murder Case: मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी