FIFA World Cup Final 2026 : फुटबॉल चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! आता थेट पहाटे ४ पर्यंत हॉटेलमधून लुटता येणार मॅचचा आनंद

मुंबई : फिफा विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना महाराष्ट्रातील फुटबॉल चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यात होणाऱ्या अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने १९ जुलैच्या मध्यरात्रीनंतर २० जुलै रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत हॉटेल, रेस्टॉरंट आणि उपाहारगृहे सुरू ठेवण्यास विशेष परवानगी दिली आहे. (FIFA World Cup Final 2026)


महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने यासंदर्भातील आदेश जारी केले असून, नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (NRAI) यांच्या मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे फुटबॉलप्रेमींना आता मोठ्या स्क्रीनवर मित्र-परिवारासोबत अंतिम सामन्याचा थरार अनुभवता येणार आहे. (FIFA World Cup Final 2026)



'या' अटींवर मिळाली परवानगी :


शासनाने दिलेल्या आदेशानुसार, ही विशेष परवानगी २० जुलै २०२६ रोजी पहाटे ४ वाजेपर्यंतच लागू असेल. मात्र, हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांनी काही महत्त्वाच्या अटींचे पालन करणे बंधनकारक असेल. (FIFA World Cup Final 2026)


- कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची जबाबदारी संबंधित आस्थापनांची असेल.
- आस्थापनाच्या आत किंवा बाहेर ध्वनीप्रदूषण होणार नाही याची दक्षता घ्यावी.
- कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी आस्थापन चालकांवर राहील.
- स्थानिक पोलीस प्रशासनाला आवश्यक वाटल्यास ही परवानगी रद्द करण्याचा अधिकार असेल. (FIFA World Cup Final 2026)



फुटबॉल चाहत्यांमध्ये उत्साह :


यंदाच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्याबाबत देशभरात प्रचंड उत्साह आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि इतर शहरांतील अनेक हॉटेल्स व स्पोर्ट्स कॅफेंमध्ये मोठ्या स्क्रीनवर सामन्याचे थेट प्रक्षेपण करण्याची तयारी सुरू झाली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मध्यरात्री सुरू होणारा अंतिम सामना आता फुटबॉलप्रेमींना अधिक आरामात आणि उत्साहात पाहता येणार आहे. (FIFA World Cup Final 2026)

Comments
Add Comment

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक