Malad Sewage Treatment Plant : मालाड मलजल प्रक्रिया केंद्राला खारफुटीसह इतर परवानगी प्राप्त; महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी):  मुंबई मलनिस्सारण प्रकल्प विभागाने ४५४ दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्या मालाड मलजल प्रक्रिया केंद्राचे काम जुलै २०२२ पासून हाती घेतले आहे. रचना व बांधकाम कालावधी ६ वर्षे. त्यापैकी २२७ दशलक्ष मलजलावर दररोज पुढील तृतीय स्तरीय प्रक्रिया केली जाईल.खारफुटी व कांदळवन काढण्यासाठी विविध परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. नवीन मलजल प्रक्रिया केंद्र सुरू झाल्यानंतर, समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता आणि सागरी जीवनामध्ये सुधारणा होईल. तसेच दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड आणि गोरेगाव परिसरातील लोकसंख्येला याचा फायदा होणार आहे. (Malad Sewage Treatment Plant )



समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मालाड येथे उभारण्यात येत असलेल्या मलजल प्रक्रिया केंद्राच्या कामांची महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी शनिवारी १८ जुलै २०२६ रोजी सकाळी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना व निर्देश दिले.अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर, स्थानिक नगरसेविका कमरजहाँ सिद्दीकी, उपायुक्त (परिमंडळ-४) भाग्यश्री कापसे, उपायुक्त (आयुक्त यांचे कार्यालय) प्रशांत गायकवाड, उपायुक्त (अभियांत्रिकी) शशांक भोरे, प्रमुख अभियंता (मुंबई मलनि:सारण प्रकल्प) (प्रभारी)अशोक मेंगडे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.




समुद्रात जाणाऱ्या पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वरळी, धारावी, वांद्रे, घाटकोपर, भांडुप, वेसावे (वर्सोवा) आणि मालाड येथे मलजल प्रक्रिया केंद्र (एसटीपी) उभारण्यात येत आहेत. या सात निर्माणाधीन प्रकल्पांची एकूण प्रक्रिया क्षमता २४६४ दशलक्ष लिटर्स प्रतिदिन इतकी आहे. कुलाबा येथे ३७ दशलक्ष लिटर्स प्रतिदिन इतक्या क्षमतेचे मलजल प्रक्रिया केंद्र बांधून ते एप्रिल २०२० मध्ये कार्यान्वित करण्यात आले आहे. सर्व निर्माणाधीन (Underconsuctoin)असलेल्या मलजल प्रक्रिया केंद्राचे कामकाज विहित कालावधीत पूर्ण करावे आणि ते तत्काळ कार्यान्वित होतील हे सुनिश्चित करावे, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले. तसेच, मालाड येथील मलजल प्रक्रिया केंद्राच्या उभारणीचे कामकाज गतीने सुरू असून येथील प्रगती समाधानकारक आहे, असेही त्यांनी सांगितले. (BMC News)




भिडे यांनी प्रारंभी मालाड येथील मलजल प्रक्रिया केंद्राच्या स्थापत्य तसेच यांत्रिकी व विद्युत अभियांत्रिकी कामांचा आढावा घेतला. प्रकल्पाच्या विविध घटकांची सद्यस्थिती, कामाची प्रगती, गुणवत्तेचे निकष तसेच उर्वरित कामांचे नियोजन याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. विविध यंत्रसामग्रीची उभारणी, विद्युत यंत्रणेची उभारणी, प्रक्रिया युनिट्सची कार्यक्षमता आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांची त्यांनी पाहणी केली. तसेच, प्रत्येक टप्प्यात गुणवत्तेची काटेकोर अंमलबजावणी करत नियोजित मुदतीत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. (Malad Sewage Treatment Plant )




मालाड (४५४ दशलक्ष लीटर प्रतिदिन), वरळी (५०० दशलक्ष लीटर प्रतिदिन), भांडुप (२१५ दशलक्ष लीटर प्रतिदिन), वांद्रे(३६० दशलक्ष लीटर प्रतिदिन), धारावी (४१८ दशलक्ष लीटर प्रतिदिन), घाटकोपर (३३७ दशलक्ष लीटर प्रतिदिन), वेसावे (वर्सोवा) (१८० दशलक्ष लीटर प्रतिदिन), कुलाबा (३७ दशलक्ष लीटर प्रतिदिन) अशा एकूण २ हजार ५०१ दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्या मलजल प्रक्रिया केंद्राच्या कामकाजाच्या सद्यस्थितीचा आढावा भिडे यांनी यावेळी संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून घेतला. तसेच, सर्व कंत्राटदारांना विहित मुदतीत आणि गुणवत्तापूर्ण कामे करण्याचे निर्देशही यावेळी दिले.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.