Nashik Crime News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा संशयित जेरबंद

Nashik Crime News : उपनगर पोलीस ठाण्याच्या (Upnagar Police Station) हद्दीतून अल्पवयीन मुलीला पळवून नेत त्यानंतर तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आणि गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या १९ वर्षीय संशयिताला गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने ताब्यात घेतलंय. चिराग संतोषसिंग परदेशी (वय १९, रा. पंचवटी) असे संशयिताचे नाव असून उपनगर पोलीस ठाण्यात (Upnagar Police Station) त्याच्याविरोधात पोक्सोसह (POCSO) अपहरणाचा गुन्हा दाखल आहे.


गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित पोलिसांना गुंगारा देत फरार होता. अखेर पोलिसांनी या प्रकरणाचा शिताफीने तपास करत गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, संशयित संशयित चिराग परदेशी हा पंचवटी येथील सीतागुंफा परिसरात वावरत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट-२ (Crime Branch Unit-2) चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार संजय सानप, बाळू शेळके, शंकर काळे, सुनील आहेर यांच्या पथकाने सीतागुंफा परिसरात सापळा रचून चिराग परदेशी याला ताब्यात घेतले आहे.



पत्नी आणि मुलाची हत्या करून पतीची आत्महत्या


दरम्यान, दुसरीकडे नाशिकमधून पुन्हा एकदा खळबळजनक घटना समोर आली आहे. नाशिकरोडच्या (Nashik Road) जेलरोड भागातील (Jail Road Area) गोकुळ नगर परिसरात पतीने पत्नी आणि लहान मुलाची हत्या करून स्वत: विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. किरण एकनाथ हजारे (वय ५४) आत्महत्या (Suicide) केलेल्याचे नाव असून, त्याने पत्नी आणि मुलाची हत्या का केली? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. ( Nashik Crime News )


दरम्यान, शहरातील इंदिरानगर परिसरातील (Indiranagar Area) वनसंपदा सोसायटी उद्यानाजवळ शुक्रवारी (दि. १७) रात्री साडेदहाच्या सुमारास एका तरुणीची (Woman) गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर सदर प्रकरणातील संशयित आरोपीनेही काही तासांतच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा गोकुळ नगर परिसरात अशा प्रकारची घटना घडल्याने नाशिकमध्ये एकच खळबळजनक घडली आहे.

Comments
Add Comment

Jalgaon : चाळीसगाव रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट! पार्सल हब म्हणून विकसित करण्याची रेल्वेची तयारी

चाळीसगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील चाळीसगाव रेल्वे स्थानकाला आता पार्सल हब म्हणून विकसित करण्याची

Jai Meena Asian Games : "पंतप्रधानांनी पाठ थोपटत म्हटलं, 'धन्यवाद आपका'..."; आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचणाऱ्या जय मीनाच्या खास आठवणी!

जपानमधील आयची-नागोया येथे पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये (Aichi-Nagoya Asian Games 2026) भारताचा प्रतिभावान खेळाडू

Nashik Crime : नाशिकमध्ये एमडी ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Nashik Crime : नाशिक शहरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

Virar News: विरारमध्ये ज्युनिअर आर्टिस्टची आत्महत्या, अश्लील व्हिडिओंच्या आधारे कोट्यवधींची खंडणी उकळल्याचा आरोप

विरार: अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी उकळल्याच्या प्रकाराला कंटाळून

Dussehra 2026 : यंदा विजयादशमी २० की २१ ऑक्टोबरला ? जाणून घ्या रावण दहनाची योग्य वेळ आणि पूजेचे मुहूर्त!

भारतीय संस्कृतीमध्ये साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत पवित्र, आनंदाचा आणि उत्साहाचा सण म्हणजे 'दसरा' किंवा

Dhanush-Mammootty Movie : धनुष आणि ममूटी पहिल्यांदाच एकत्र झळकणार ? ‘OM: Chapter 1’ चित्रपटाची चर्चा, रिलीज डेट आली समोर

Dhanush-Mammootty Movie : दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज कलाकार एकाच चित्रपटात पाहायला मिळणार असल्याच्या चर्चेने