Kalyan Murder Case : दृश्यम फेल! घरमालकाला व्हॉइस मेल आला अन् भांडं फुटलं, बॉयफ्रेडचा मृतदेह आढळला गोणीत

कल्याणमधील हत्याकांड प्रकरणात वेगळेच वळण; फिंगरप्रिंट्स पुसले, घरमालकाला मेसेज पाठवला अन्...


मुंबई :  कल्याणमधील (Kalyan) मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका हत्याकांडाने (Murder) परिसरात खळबळ उडाली आहे. मलंग रोडवरील नीलकंठ सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये तरुणाचा मृतदेह आढळून आला असून, पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने केलेल्या प्रयत्नांनी पोलिसांनाही धक्का बसला आहे. या प्रकरणी एका महिलेवर संशय असून ती घटनेनंतर कोलकात्याकडे पळाल्याची माहिती समोर आली आहे. (Kalyan Crime)


मिळालेल्या माहितीनुसार, फ्लॅटमधून गेल्या अडीच दिवसांपासून पाणी बाहेर वाहत असल्याची माहिती सोसायटीतील रहिवाशांनी घरमालक अजय पाटील यांना दिली होती. त्यांनी भाडेकरूंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्याचदरम्यान संबंधित महिलेने घरमालकाच्या मोबाईलवर व्हॉइस मेल पाठवला. त्यामुळे संशय अधिक वाढला आणि घरमालकाने पोलिसांना माहिती दिली. (Murder)



फ्लॅटचा दरवाजा उघडला अन्


पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून फ्लॅटचा दरवाजा उघडला. घरात कोणीही नव्हते. बाथरूममध्ये तपास केला असता एका गोणीत सडलेल्या अवस्थेतील तरुणाचा मृतदेह आढळला. प्राथमिक तपासात त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. (Boyfriend Murder)


तपासात आणखी धक्कादायक बाब समोर आली. मृतदेह गोणीत ठेवून बाथरूममध्ये ठेवण्यात आला होता. त्यावर सतत पाणी पडावे यासाठी नळ सुरू ठेवण्यात आला होता. त्यामुळे रक्ताचे डाग आणि इतर पुरावे नष्ट व्हावेत, तसेच मृतदेह लवकर सडावा, असा आरोपीचा हेतू असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. (Manpada Police)



घटनेनंतर संशयित महिला कल्याणमधून निघून सुमारे 1900 किलोमीटर दूर असलेल्या कोलकात्यात गेल्याची माहिती तपासात समोर आली आहे. मानपाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून फॉरेन्सिक पथक घटनास्थळावरील पुरावे गोळा करत आहे. हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली, तसेच आरोपी महिलेचा उद्देश काय होता, याचा सखोल तपास सुरू आहे. (Crime News)


Comments
Add Comment

Mobile New Rules: Truecaller शिवाय कळणार अनोळखी कॉल कोणाचा! 1 नोव्हेंबरपासून मोबाईलवर दिसणार कॉल करणाऱ्याचं नाव

Mobile New Rules: मोबाईलवर अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास तो नेमका कोणाचा आहे, हे जाणून घेण्यासाठी अनेकजण Truecaller सारख्या अ‍ॅपचा

Jio Platforms IPO : रिलायन्सचा मोठा निर्णय; Jio IPO प्राईस बँड जाहीर, भागधारकांना विशेष लाभ!

Jio Platforms IPO: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजची डिजिटल आणि टेलिकॉम कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्सचा

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी नाशिक पोलिसांची तयारी, गोदाकाठावर रंगीत तालीम

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहण सोहळा पार

Saurabh Rajput Murder Case : सौरभ राजपूत हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा; निर्भया प्रकरणातील जल्लाद पवन यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Saurabh Rajput Murder Case: मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात