Eetha Movie : 'इठा' चित्रपटावर कायदेशीर कारवाईची टांगती तलवार! विठाबाईंच्या कुटुंबीयांचा संताप; म्हणाले, "इतिहासाची मोडतोड खपवून...

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सध्या तिच्या आगामी 'इठा' (Eetha) चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. हा बहुचर्चित चित्रपट महाराष्ट्राच्या तमाशा सम्राज्ञी स्वर्गीय विठाबाई नारायणगावकर (Vithabai Narayangoankar) यांच्या जीवनप्रवासावर आधारित आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांमध्ये याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, सुरुवातीला केवळ चित्रपटाच्या नावावरून झालेला वाद शमत नाही तोच, आता हा सिनेमा एका नव्या आणि गंभीर वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. विठाबाईंच्या स्वतःच्या कुटुंबीयांनीच आता चित्रपटाच्या कथेवर आणि ऐतिहासिक तथ्यांवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.



टीझरमधील 'या' गंभीर त्रुटींवर आक्षेप


विठाबाई नारायणगावकर यांचे नातू धनंजय खुडे यांनी या चित्रपटाच्या टीझरवर नाराजी व्यक्त करत निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, चित्रपटात मूळ इतिहासाची मोठ्या प्रमाणावर मोडतोड करण्यात आली असून चुकीची माहिती प्रेक्षकांसमोर मांडली जात आहे. खुडे यांनी निदर्शनास आणून दिले आहे की, खऱ्या तमाशा फडाचे मूळ नाव 'भाऊ बापू नारायणगावकर तमाशा मंडळ' असे होते; परंतु टीझरमध्ये त्याचा 'भाऊ गावकर तमाशा मंडळ' असा पूर्णपणे चुकीचा उल्लेख करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, १९६१ साली विठाबाईंना मिळालेल्या प्रतिष्ठेच्या राष्ट्रपती पदक वितरणाचा प्रसंगही वास्तवाला धरून नसून त्याचे चुकीचे सादरीकरण करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.



कुटुंबीयांची परवानगी न घेताच निर्मिती


या चित्रपटाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर करत आहेत. मात्र, धनंजय खुडे यांनी स्पष्ट केले आहे की, हा महत्त्वाकांक्षी चित्रपट बनवण्यापूर्वी दिग्दर्शक किंवा निर्मिती संस्थेने विठाबाईंच्या कुटुंबीयांची कोणतीही अधिकृत परवानगी घेतलेली नाही. ऐतिहासिक सत्यतेची कोणतीही शहानिशा न करता आणि कुटुंबाला विश्वासात न घेता हा जीवनपट पडद्यावर आणला जात असल्याबद्दल त्यांनी अत्यंत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.



बदल करा, अन्यथा न्यायालयात खेचू!


इतिहासाची झालेली ही मोडतोड खपवून घेतली जाणार नाही, असे सांगत कुटुंबीयांनी चित्रपट निर्मात्यांना थेट इशारा दिला आहे. या चित्रपटाचे 'इठा' हे वादग्रस्त नाव तातडीने बदलावे आणि कथेत दाखवण्यात आलेल्या चुकीच्या ऐतिहासिक बाबींमध्ये लवकरात लवकर सुधारणा करावी, अशी ठाम मागणी कुटुंबाकडून करण्यात आली आहे. जर या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकून कायदेशीर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा विठाबाईंच्या कुटुंबीयांनी दिला आहे. त्यामुळे आता दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर आणि चित्रपटाची टीम या आरोपांवर काय भूमिका घेते आणि चित्रपटात नेमके काय बदल करते, याकडे संपूर्ण मनोरंजन विश्वाचे आणि महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

Comments
Add Comment

Rohit Sharma New Reality Show : क्रिकेटच्या मैदानावर सिक्सर मारणारा हिटमॅन आता टेलिव्हिजनचा TRP वाढवणार, रोहित शर्माचा नवा रिऍलिटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : सर्वांचा लाडका 'हिटमॅन' म्हणून ओळखला जाणारा क्रिकेटर रोहित शर्मा टीव्हीवर एक नवा रिएलिटी शो घेऊन येत आहे.

Badshah Isha Rikhi Divorce : अवघ्या ५ महिन्यांतच संपलं नातं! प्रसिद्ध गायक बादशाहचा घटस्फोट; सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ

प्रसिद्ध रॅपर बादशाह आणि अभिनेत्री ईशा रिखी यांच्या नात्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लग्नाच्या अवघ्या पाच

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या