Spain vs Argentina : अंतिम सामन्यांनंतर अर्जंटिनाला मोठा धक्का ! फिफाकडून खेळाडूंवर कारवाईची शक्यता; नेमकं प्रकरण काय ?

मुंबई : फिफा विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात स्पेनने १-० ने अर्जेंटिनाचा पराभव केला होता. अंतिम सामन्यांनंतर अर्जेंटिनाला दुहेरी झटका लागला आहे. सामना संपल्यानंतर स्पेनच्या खेळाडूंशी झालेल्या वादानंतर फिफाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.काही खेळाडूंवर दंडही आकण्यात येऊ शकतो असं बोलले जात आहे. (Arg vs spa)



नेमकं प्रकरण काय ?


स्पेनकडून १-० ने झालेल्या पराभवानंतर अंतिम शिट्टी वाजताच अर्जेंटिनाचा मिडफिल्डर लिएँद्रो पारेडेस याचा एरिक गार्सिया,गावीसोबत आणि काही खेळाडूंशी वाद झाला. हिंसक वर्तन केल्याप्रकरणी पारेदेसला रेड कार्डही देण्यात आलं होते. मात्र, या वादाचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.या वादचा व्हिडिओ सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये शिट्टी वाजल्यानंतर एरिक मैदानावर पडल्याचं दिसतं आहे आणि त्यानंतर पारेडेसशी शा‍ब्दिक वाद घालत होता.या वादादरम्यान पारेदेसने गार्सियाच्या मानेजवळ हात ठेवत त्याला जोरात ढकलल्याचंही प्रयत्न केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. (Argentina)


 



 

याचदरम्यान, अर्जेंटिनाचा बचावपटू नाहुएल मोलिना याने स्पेनचा कर्णधार रोद्रीला पाडण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्तही आले आहेत. इतकंच नव्हे, तर अर्जेंटिनाचे सहाय्यक प्रशिक्षक रोबर्टो आयासा यांनी डॉनी ओल्मो याच्या चेहऱ्यावर ठोसा मारण्याचा प्रयत्न केल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. या सर्व प्रकरणाची फिफाकडून दखल घेण्यात आली आहे.विजेतेपद हातातून निसटत असल्याचं लक्षात आल्यानंतर अर्जेंटिनाने अखेरच्या काही मिनिटांत आक्रमक खेळ करण्याचा निर्णय केला. मात्र, त्यापूर्वी खूप उशीर झाला होता. अंतिम शिट्टी वाजताच स्पेनच्या काही खेळाडूंनी विजयाच्या जल्लोषात मैदानात धाव घेतली . त्यावेळी दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये धक्काबुक्की आणि वाद झाला. (Spain)


 



 


अर्जेंटिनाचे स्वप्नं अपूर्ण


संपूर्ण सामन्यात युरोपियन चॅम्पियन स्पेनने आपेल वर्चस्व राखलं. स्पेनने या सामन्यात अनेक संधी निर्माण केली. मात्र त्यांना ९० मिनिटांत एकही गोल करता आले नाही. अखेर अतिरिक्त वेळेच्या दुसऱ्या हाफमध्ये फेरान टोरेसने शानदार गोल करत स्पेनला आघाडी मिळवून दिली. अखेर स्पने हा सामना जिंकत दुसर्‍यांदा विश्वचषक जिंकले. १९६२ मध्ये ब्राझीलनंतर सलग दोन विश्वचषक जिंकणार पहिला संघ बनण्याची अर्जेंटिनाकडे संधी होती. (FIFA World Cup)

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून