MIDC Maharashtra : वैभववाडी 'MIDC'ला मूर्त रूप, पायाभूत सुविधांची कामे तातडीने सुरू करण्याचे मंत्री उदय सामंतांचे निर्देश

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत मंत्रालयात बैठक


मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी बहुप्रतिक्षित वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) क्षेत्राचा विकास आता वेगाने होणार आहे. या औद्योगिक वसाहतीमध्ये सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (MSME) प्राधान्य देत पायाभूत सुविधांची कामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने मंत्रालयातील उद्योगमंत्र्यांच्या दालनात मंगळवारी आयोजित विशेष बैठकीत ते बोलत होते.(Nitesh Rane)



या बैठकीला एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्रसिंह कुशवाह, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), भाजप वैभववाडी तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या वेळी उद्योगमंत्री डॉ. सामंत म्हणाले की, नाधवडे येथील ११.१४ हेक्टर जमिनीची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली असून ही जमीन एमआयडीसीच्या ताब्यात आली आहे. संबंधित शेतकऱ्यांना मोबदल्याचे वाटप पूर्ण झाले असून सातबारा उताऱ्यावर महामंडळाच्या नावाची नोंदही झाली आहे. सन २०२२-२३ मध्ये तयार करण्यात आलेले पायाभूत सुविधांचे अंदाजपत्रक आता कालबाह्य झाल्यामुळे त्याचा तातडीने फेरआढावा घेऊन सुधारित अंदाजपत्रक मंजुरीसाठी सादर करावे. सुमारे १५ कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांच्या विकासकामांना विलंब न लावता तातडीने सुरुवात करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.



उद्योगमंत्र्यांनी एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष स्थळपाहणी करून वास्तववादी अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश दिले. तसेच औद्योगिक क्षेत्राला वीज पुरवठा करण्यासाठी प्रस्तावित ३३/११ केव्ही वीज उपकेंद्रासाठी आवश्यक असलेली ४० गुंठे जमीन सार्वजनिक हिताच्या दृष्टीने उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी या क्षेत्रात एमएसएमई उद्योगांसाठी भूखंड पाडण्यास (प्लॉटिंग) प्राधान्य दिले जाईल आणि आवश्यक प्रतिसाद न मिळाल्यास पुढील टप्प्यात मोठ्या उद्योगांचा विचार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.




स्थानिक युवकांना रोजगार मिळणार - मंत्री नितेश राणे


दरम्यान, नाधवडे औद्योगिक क्षेत्र राष्ट्रीय महामार्गालगत असून ते प्रस्तावित वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्ग आणि विद्यमान रेल्वे स्थानकाच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे उत्कृष्ट रस्ते आणि रेल्वे संपर्काचा लाभ या परिसराला मिळणार असून, भविष्यात हे क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रमुख औद्योगिक केंद्र बनेल, असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. या प्रकल्पामुळे स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तसेच कामे करताना स्थानिक पाण्याचे उगमस्थान सुरक्षित राहील आणि पर्यावरणावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, याची पूर्ण दक्षता घेतली जाईल, असे आश्वासनही या वेळी देण्यात आले.

Comments
Add Comment

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा