Ashadhi Wari Special Train : आषाढी वारीसाठी रेल्वेची मोठी भेट! CSMT–मिरज दरम्यान आणखी २ विशेष 'वन-वे' गाड्या; २३ जुलैपासून आरक्षण सुरू

मुंबई : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी आणि भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते मिरज दरम्यान आणखी दोन 'वन-वे' आषाढी विशेष गाड्या चालविण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. (Ashadhi Wari Special Train)



'या' दिवशी धावणार विशेष गाड्या :


गाडी क्रमांक 01183 ही 'वन-वे' विशेष गाडी २५ जुलै २०२६ रोजी दुपारी ३.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल आणि २६ जुलै रोजी पहाटे ३.३० वाजता मिरज येथे पोहोचेल. तर गाडी क्रमांक 01181 ही विशेष गाडी २६ जुलै २०२६ रोजी रात्री १२.२५ वाजता CSMT येथून सुटून त्याच दिवशी सकाळी ११.२५ वाजता मिरजला पोहोचेल. (Ashadhi Wari Special Train)



'या' स्थानकांवर थांबा :


दोन्ही विशेष गाड्या दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डुवाडी आणि पंढरपूर या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहेत. त्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे आणि सोलापूर मार्गावरील भाविकांनाही या गाड्यांचा लाभ घेता येणार आहे. (Ashadhi Wari Special Train)



गाड्यांची संरचना :


या विशेष गाड्यांमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी विविध श्रेणीतील डबे उपलब्ध असतील.


१ वातानुकूलित द्वितीय श्रेणी
३ वातानुकूलित तृतीय श्रेणी
८ शयनयान (स्लीपर)
४ सामान्य द्वितीय श्रेणी डबे
२ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन
२३ जुलैपासून आरक्षण सुरू



गाडी क्रमांक 01183 आणि 01181 या दोन्ही विशेष गाड्यांचे आरक्षण २३ जुलै २०२६ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच IRCTCच्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे. प्रवासी 'रेलवन' (RailOne) अॅपद्वारेही तिकीट आरक्षित करू शकतात. मध्य रेल्वेने प्रवाशांना गाड्यांच्या सविस्तर वेळापत्रकासाठी NTES अॅप किंवा भारतीय रेल्वेच्या अधिकृत चौकशी संकेतस्थळाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. (Ashadhi Wari Special Train)


आषाढी वारीसाठी दरवर्षी लाखो वारकरी पंढरपूरकडे रवाना होत असतात. ही अतिरिक्त विशेष रेल्वे सेवा सुरू केल्यामुळे भाविकांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि आरामदायी होणार आहे. (Ashadhi Wari Special Train)

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म