BMC : महापालिका सभेपाठोपाठ वैधानिक समित्यांचेही थेट प्रक्षेपण?

महापालिका सभागृहात ठराव मंजूर


मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सभागृहातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यात येत असून सभागृहातील कामकाजात नगरसेवकांचा वाढलेला प्रतिसाद पाहता आता सभागृहाच्या धर्तीवर वैधानिक समितीच्या सभेचेही यूट्युब चॅनेलच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. याबाबतचा ठराव महापालिका सभागृहात मंजूर करण्यात आला आहे.


महापालिका सभेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण युट्युब (YouTube) या प्रसार माध्यमाच्या मार्फत नागरिकांना नियमित पाहण्यास उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याच धर्तीवर वैधानिक समितींच्या सभा ज्या सभागृहात होतात त्या सभांच्या कामकाजांचे थेट प्रक्षेपण युट्युब ह्या प्रसार माध्यमाच्या मार्फत नागरिकांना नियमित पाहण्यास उपलब्ध करून देण्याची मागणी नगरसेवक सचिन पडवळ यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. हा ठराव महापालिका सभागृहात मंजूर करण्यात आला.



पडवळ यांनी असे नमुद केले आहे की मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून संपूर्ण देशाचे नव्हे तर जगाचे लक्ष मुंबई महानगरपालिकेवर असते. मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात जे कामकाज चालते त्याचे थेट प्रक्षेपण नागरिकांना दाखविले जाते. त्याचप्रमाणे मुंबई शहरामध्ये प्रशासनाचे कामकाज हाताळण्यासाठी स्थायी समिति, शिक्षण समिति, सुधार समिति, 'बेस्ट' समिति ह्या वैधानिक समित्या अस्तित्वात असून ह्या समित्यांमध्ये आयुक्तांपासून अतिरिक्त आयुक्त, महानगरपालिका उपायुक्त, संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी तसेच या समित्यांचे सदस्य उपस्थित असतात. मुंबईच्या दृष्टिकोनातून या समित्यांचे कसे कामकाज चालते, नागरिकांनी निवडून दिलेले नगरसेवक कसे कामकाज करतात, मुंबई शहरासाठी कोणते प्रश्न मांडतात, प्रशासन त्या प्रश्नांवर कोणती उपाययोजना करतात हे मुंबईकर जनतेला समजणे गरजेचे आहे असे म्हटले आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने