Devendra Fadnavis : विरोधकांनी राजकारणासाठी देशाची बदनामी करू नये!

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; वाढदिवशी सर्व सोहळे टाळत पायी वारीमध्ये सहभागी


मुंबई : "विद्यार्थ्यांच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करणे हे सरकारचे कर्तव्य असून केंद्र व राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या हिताचेच निर्णय घेईल. परंतु, विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय स्वार्थासाठी काही पक्ष देशाची बदनामी करत आहेत, हे अयोग्य आहे," अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बुधवारी दिली. स्वतःच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सर्व राजकीय व औपचारिक सोहळे टाळून पंढरपूर वारीमध्ये पायी चालत सहभागी झाल्यानंतर ते सोलापूर येथे माध्यमांशी बोलत होते.


दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना टोला लगावताना मुख्यमंत्री (Devendra Fadnavis) म्हणाले की, सर्वांनी सर्वप्रथम देशाचा विचार केला पाहिजे. परीक्षा किंवा शिक्षण व्यवस्थेत काही उणिवा राहिल्या असतील तर त्या दूर केल्या जातील आणि सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्यांशी पूर्णपणे समरस आहे. मात्र, या मुद्द्याचे राजकारण करून देशाची बदनामी करणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.



आपल्या वाढदिवशी वारीत सहभागी होण्याबाबत आनंद व्यक्त करताना फडणवीस म्हणाले, "आजच्या दिवशी वारीत चालण्याची आणि जगद्गुरू तुकाराम महाराज तसेच संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे दर्शन मिळणे हा अतिशय भाग्याचा योग आहे. वारकरी हे माऊलींचे जिवंत स्वरूप आहेत आणि त्यांचे सानिध्य मिळणे ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. माऊलीकडे काही मागण्याची गरज नसते, तरीही राज्यातील शेतकरी सुखी व्हावा आणि चांगला पाऊस पडावा, हेच साकडे मी घातले आहे." (Devendra Fadnavis)



या वेळी त्यांनी पंढरपूर वारीच्या नियोजनाचे कौतुक केले. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून यंदाच्या वारीतील गर्दीचा अंदाज घेतला जात असून, यंदाच्या वारीने सर्व जुने विक्रम मोडल्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हा प्रशासनाने केलेल्या स्वच्छतेच्या व आरोग्य सुविधांच्या नियोजनामुळे वारकऱ्यांची सोय झाली असून, चंद्रभागेच्या वाळवंटातील स्वच्छता आणि जर्मन हँगरसारख्या आधुनिक सुविधांमुळे वारीचे स्वरूप अधिक निटनेटक झाले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. (Devendra Fadnavis)




Comments
Add Comment

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Jalgaon Crime : संतापजनक ! ‘दुधा’च्या नावाखाली काळा धंदा ! गायीच्या दुधात चक्क 'या' तेलाची भेसळ अन् पुढे...

Jalgaon Crime : गायीच्या दुधात थेट सोयाबीन तेल मिसळून त्याची फॅट वाढवायची आणि हेच भेसळयुक्त दूध ‘म्हशीचे दूध’ म्हणून

Ulhasnagar Stamp Duty Amnesty Scheme : उल्हासनगरवासीयांना दिलासा! अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Nashik Crime : एटीएसच्या नावाने ‘डिजिटल अरेस्ट’, नाशिकच्या मॅनेजरची ९० लाखांची फसवणूक

Nashik Crime : नाशिकमध्ये सायबर फसवणुकीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुन्हेगारांनी स्वतःला एटीएस आणि मुंबई

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र