Mumbai Lake : मुंबईला पाणीपुरवठा करणारा तानसा तलावही ओसंडून वाहू लागला

सचिन धानजी


मुंबई : मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी (Lakes) तानसा तलाव बुधवारी २२ जुलै रोजी वाहू लागला. बुधवारी सकाळी साडेआठ वाजता वाहू लागला अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.त्यामुळे वर्षाच्या तुलनेत यंदा एक दिवस आधीच तानसा तलावाने भरून वाहण्याची किमया साधली. मागील वर्षी २३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी हा तलाव ओसंडून वाहू लागला होता.


मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता ही सुमारे १,४४,७३६.३ कोटी लीटर (१४,४७,३६३ दशलक्ष लीटर) इतकी आहे. बुधवारी पहाटे ६ वाजताच्या मोजणीनुसार सर्व ७ तलावांमध्ये मिळून ८९,५९०.० कोटी लीटर (८,९५,९०७ दशलक्ष लीटर) इतका जलसाठा उपलब्ध आहे. हा जलसाठा एकूण जलसाठ्याच्या अर्थात १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटरच्या तुलनेत ६१.९०टक्के इतका आहे.





संपूर्ण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी महत्त्वाचा असणारा तानसा तलाव बुधवारी सकाळी ८.५१ वाजेच्या सुमारास ओसंडून वाहू लागला आहे. तानसा धरणाचे दरवाजे उघडले आहेत. तानसा तलावाची कमाल जलधारण क्षमता १४,४९४.६ कोटी लीटर अर्थात १४४,९४६ दशलक्ष लीटर इतकी आहे. यापूर्वी विहार आणि तुळशी तलाव एकच दिवशी भरून वाहू लागले आहेत.



हा तलाव (Lake) यापूर्वी कधी किती वाजता भरला होता..



  • २२ जुलै २०२६, सकाळी ८.३० मिनिटे

  • २३ जुलै २०२५, सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटे

  • २४ जुलै २०२४, सकाळी

  • २६ जुलै २०२३ पहाटे ४.३० वाजता

  • १४ जुलै २०२२ रात्री ८.५० वाजता,

  • २२ जुलै २०२१ रोजी पहाटे ०५.४८ वाजता,

  • २० ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ७.०५ वाजता


 
Comments
Add Comment

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून